Tarun Bharat

मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी घरगुती उपाय

Advertisements


आजच्या धावपळीच्या जगात फार कमी वयातच मधुमेह (Diabetes) होतो. मग यासाठी असमतोल आहार ,ताणतणाव ,व्यसन ,अनुवंशिकता असे अनेक घटक कारणीभूत ठरतात.या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी अनेक औषधं घेतली जातात.पण फकत औषधे न घेता प्रत्येकाने आपली वैयक्तिक काळजी घेणं देखील फार गरजेचे आहे. विशेष म्हणजे यातली अनेक औषधं आपल्या घरातही सहज उपलब्ध होतात. त्यामुळे घरच्या घरी हे उपाय करून मधुमेह आटोक्यात ठेवता येतो.जाणून घेऊयात मधुमेह नियंत्रणासाठी घरगुती उपाय काय आहेत.

रोजच्या आहारात काही भाज्यांचा समावेश करून मधुमेह नियंत्रणात ठेवता येऊ शकतो. कारलं, काकडी, टोमॅटो, सलगम, करवंद, भोपळा, पालक, मेथी, कोबी या भाज्या भरपूर खाव्यात. बटाटे आणि रताळी आहारातून वर्ज्य करावीत. फळांमध्ये सफरचंद, डाळिंब, संत्री, पपई, पेरू ही फळं खावीत आणि आंबा, केळी, लिची, द्राक्षं अशी फळं कमी खावीत. मधुमेहाच्या रुग्णांनी साखर, गूळ, उसाचा रस, चॉकलेट अजिबात खाऊ नये.एकाच वेळी जास्त अन्न खाऊ नये. भूक लागल्यावरही कमी प्रमाणात खावं.मधुमेहाच्या रुग्णांनी दररोज अर्धा तास चालणं आणि दररोज व्यायाम करणं आवश्यक आहे. शक्य असल्यास योगासनं करावीत.दररोज सकाळी रिकाम्या पोटी तुळशीची 2 ते 3 पानं खावीत. यामुळे साखर किंवा मधुमेहाची लक्षणं कमी होतील.तुळशीतले अँटिऑक्सिडंट्सआणि आवश्यक घटक शरीरात इन्सुलिन साठवून ठेवणाऱ्या आणि सोडणाऱ्या पेशींना योग्यरीत्या कार्य करण्यास मदत करतात.रात्री झोपण्यापूर्वी एका ग्लास पाण्यात मेथीचे दाणं घालावेत. सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी हे पाणी प्यावं आणि मेथीचे दाणे चावून खावेत. याचं नियमित सेवन केल्याने मधुमेह नियंत्रणात राहतो.जांभूळ हे मधुमेहावर प्रभावी आहे. जांभळावर काळं मीठ घालून खाल्ल्यानेही रक्तातल्या साखरेचं प्रमाण नियंत्रणात राहते.कडुनिंबाच्या पानांचा रसही यावर लाभदायी ठरतो. आयुर्वेदानुसार हा रस रोज सकाळी रिकाम्या पोटी घ्यावा.

Related Stories

धोका ‘ब्लॅक फंगस’चा

Omkar B

लॅपटॉपवर काम,अनारोग्याला निमंत्रण

Amit Kulkarni

जपा मुलांचे डोळे

Omkar B

जाणून घ्या: जमिनीवर बसून जेवणाचे जबरदस्त फायदे

Abhijeet Shinde

तळपायाला घाम येतोय? वेळीच काळजी घ्या, नाहीतर होऊ शकतो गंभीर आजार

Rohan_P

ब्रेन टय़ुमरची लक्षणे ओळख

tarunbharat
error: Content is protected !!