तरुणभारत ऑनलाइन
आजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्या आरोग्याची,त्वचेची काळजी घेणं कठीण जाते.अशातच डोळ्याखालील काळ्या वर्तुळांमुळे त्याचा चेहऱ्यावरही परिणाम दिसतो. जास्त काम करणे, तणावात राहणे, झोप पुरी न होणे तसेच अन्य कारणाने डोळ्याच्या खाली काळे डाग दिसतात. हे काळे डाग घालविण्यासाठी घरगुती सोपा उपाय आपण करु शकता. पाहुयात हे कोणते उपाय आहेत.
कच्चा बटाटा
कच्च्या बटाट्याचे काप किंवा बटाट्याचा रस दररोज डोळ्यांखाली लावल्याने फायदा होऊ शकतो. यामुळे डोळ्यांना थंडावा मिळतो.
लिंबू
लिंबाचा रस कापसाने डोळ्यांखाली लावल्याने, हळू-हळू फरक जाणवू शकतो.
कच्चा टोमॅटो
कच्चा टोमॅटो किंवा टोमॅटोचा रस डोळ्यांखाली लावल्याने फायदा होऊ शकतो. संपूर्ण चेहऱ्यावरही टोमॅटो लावू शकता. यामुळे चेहरा चमकदार आणि काळी वर्तुळं कमी होण्यास मदत होऊ शकते.
पाणी
दिवसभरात २ ते ३ लीटर पाणी पिण्यानेही फरक पडू शकतो. आहारात ताज्या फळांच्या रसाचा समावेश करु शकता.
बदाम तेल किंवा नारळाचं तेल
रोज रात्री नारळाच्या किंवा बदामाच्या तेलाचे काही थेंब डोळ्यांखाली लावून मसाज केल्याने फायदा होऊ शकतो.
मेकअप काढायला विसरु नका
रात्री झोपण्याआधी चेहरा, डोळ्यांचा मेकअप काढून टाकण्यास विसरु नका.