Tarun Bharat

हात-पायावरील टॅनिंग दूर करायचयं; ‘या’ घरगुती टिप्स करा फॉलो

Advertisements

ऑनलाईन टीम/तरुण भारत

प्रत्येक जण चेहऱ्याची नीटनेटकी काळजी घेत असतो. चेहऱ्यावर एखादा पिंपल्स जरी आला तर आपण लगेच डॉक्टरांचा सल्ला घेऊन नाना तरेचे उपाय आपण करत असतो. पण चेहऱ्या इतकेच महत्वाचे असणारे आपले हात-पाय याकडे मात्र जास्त लक्ष देतोय असं वाटत नाही. उन्हाळ्यात चेहऱ्याप्रमाणेच हात आणि पायांवर देखील टॅनिंग होते. हात पायावरील टॅनिंग काढणे तसे अवघड वाटते. पण तुम्ही घरच्या घरी स्क्रबने सहज काढू शकता. या काही ट्रिक्स आणि टिप्स ट्राय करा.

प्रत्येकजण आपल्या चेहऱ्याची योग्य काळजी घेत असतो. पण हात आणि पायांची हवी तशी काळजी आपण घेताना दिसत नाही. उन्हाळ्यात हातावर जास्तीत जास्त टॅनिंग होते. अशा परिस्थितीत, टॅनिंग टाळण्यासाठी, आपण हात आणि पायांवर सनस्क्रीन देखील लावले पाहिजे. तसेच त्वचेच्या सर्व उघड्या भागांवर सनस्क्रीन लावणे खूप महत्वाचे आहे. यामुळे उन्हापासून थोडंफार संरक्षण मिळत. जर तुमचे हात टॅन झाले असतील तर तुम्ही घरगुती उपायांनी हातांवर घरगुती स्क्रब लावून टॅनिंग दूर करू शकता. यासाठी पार्लरला जाऊन पैसे खर्च करण्याची गरज नाही. त्यामुळे होममेड होममेड टॅन रिमूव्हल स्क्रब कसा वापरायचा ते पाहुयात.

एलोवेरा जेल आणि ओट्स
स्क्रब बनवण्यासाठी एक चमचा ओट्समध्ये पाच चमचे एलोवेरा जेल मिक्स करा. यानंतर हात धुवून त्यावर ऑलिव्ह ऑईल लावा. जर तुमच्याकडे ऑलिव्ह ऑईल नसेल तर तुम्ही कोकोनट ऑइल देखील लावू शकता.

मध आणि तांदळाचे पीठ
हातावरील टॅनिंग दूर करण्यासाठी मध आणि तांदळाचे पीठ देखील खूप उपयुक्त आहे. यासाठी प्रथम एक चमचा तांदळाचे पीठ चार चमचे मधात मिक्स करा. आता हे हातावर लावून स्क्रब करा आणि नंतर थंड पाण्याने धुवा.

साखर आणि लिंबाचा रस
हा स्क्रब बनवण्यासाठी सर्वप्रथम चार चमचे साखर घ्या आणि त्यात एक चमचा लिंबाचा रस मिक्स करा. आता हातावर चांगले घासून टॅनिंग काढून टाका. हे स्क्रब लावल्यानंतर हात पाण्याने धुवा आणि खोबरेल तेल लावा.

तांदळाचे पीठ आणि दही
घरच्या घरी उपलब्ध साहित्यापासून स्क्रब बनवण्यासाठी एक चमचा तांदळाच्या पिठात दोन चमचे दही मिक्स करा. स्क्रब करण्यापूर्वी हातांना थोडे नारळाचे तेल लावा, जेणेकरून हात रफ होणार नाहीत. आता हे स्क्रब हातांवर लावून नीट रब करा. ४-५ मिनिटे चांगले चोळल्यानंतर स्वच्छ धुवून टाका. तुम्हाला पहिल्या वापरातच फरक दिसून येईल.

Related Stories

लस आवश्यकच: पण …..

Omkar B

नवा प्रकार नवा धोका

Amit Kulkarni

जांभूळ आरोग्यासाठी फायदेशीर

Abhijeet Shinde

डबल म्युटंट कोरोनावर स्टेरॉईड रामबाण

Amit Kulkarni

ई व्हिटॅमिन कशासाठी ?

Omkar B

धनी ऍप सुरु करणार २५ लाख कुटुंबांसाठी मोफत कोविड केअर औषधांचे वितरण

Abhijeet Shinde
error: Content is protected !!