कारमध्ये 47 मांजरांसोबत वास्तव्य
अमेरिकेच्या एका व्यक्तीची कृती सर्वांची मने जिंकणारी ठरली आहे. हा व्यक्ती अलिकडेच बेघर झाला आहे. परंतु बेघर होण्यापूर्वी त्याने अनेक मांजर पाळली होती आणि त्यांना तो वाऱयावर सोडू इच्छित नव्हता. यासाठी त्याने एक युक्ती शोधून काढली असली तरीही ती फारकाळ उपयोगी राहणे अवघड आहे.


अमेरिकेत सध्या उष्णता अधिक आहे. या उष्णतेच्या लाटेदरम्यान हा व्यक्ती स्वतःच्या 47 मांजरांसह एका कारमध्ये राहत आहे. कुठल्याही स्थितीत तो स्वतःच्या मांजरांपासून दूर जाऊ इच्छित नाही. या मांजरांमध्ये लहान पिल्लांपासून 12 वर्षे वयापर्यंतची मांजरं सामील आहेत.
या मांजरांना उष्णतेपासून वाचविण्यासाठी ऍनिमल ह्युमन सोसायटीने मदतीचा हात पुढे केला आणि मांजरांच्या देखभालीची जबाबदारी घेतली. या व्यक्तीकडे पूर्वी 14 मांजर होती. सोसायटीचे सदस्य मांजरांचे लसीकरण, संतुलित आहारासह त्यांना दत्तक घेण्याची व्यवस्था करण्याचा प्रयत्न करत आहेत.
परंतु या व्यक्तीने स्वतःच्या मांजरांची काळजी घेण्याचे शक्य तितके प्रयत्न केले. परंतु ऍनिमल ह्युमन सोसायटीनुसार अशाप्रकारच्या वातावरणात राहिल्याने मांजरांची प्रकृती बिघडू शकते.