Tarun Bharat

कुडणे येथे होमकुंड जत्रोत्सव उत्साहात

Advertisements

पहाटे धोंडांचे अग्निदिव्य : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी घेतले दर्शन

प्रतिनिधी /सांखळी

 कुडणे गावातील श्री कुडणेश्वर, महालक्ष्मी देवस्थानचा वार्षिक होमकुंड जत्रोत्सव गुरुवार विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनिशी उत्साहात साजरा झाला.

ध्रम्यान, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी उपस्थित राहून श्री कुडणेश्वर देव आणि देवी महालक्ष्मीचा आशीर्वाद घेतला. जि. पं. सदस्य गोपाळ सुर्लकर, तसेच देवस्थान समिती सदस्यांची उपस्थिती होती. यंदाच्या वषी मंदिर परिसरात बरीच गर्दी पाहायला मिळाली. दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या.

  यानिमित्त मंदिरात सकाळी धार्मिक विधी त्यानंतर श्रींच्या मूर्तीस अभिषेक करण्यात आला. श्री देवी सातेरी मंदिरा जवळील तळीवर आंघोळ करून धोंड गणांचे आगमन झाल्यानंतर सुवासिनींतर्फे देवींची ओटी भरण्याचा कार्यक्रम झाला. रात्री हरवळे येथून श्री देव रुदेश्वर देवस्थानकडून येणारी ओटी, फुले, फळांची भेट देवस्थानात अर्पण करण्यात आली. गावातील प्रत्येक वाडय़ावरून धोंड गण ढोल ताशांच्या गजरात मंदिरात प्रवेश केला. पहाटे होमकुंड प्रज्वलित करण्यात आले. त्या नंतर देव रवळनाथ मंदिरात सर्व धोंडगण कृपा प्रसाद घेतल्यावर होमकुंडच्या पेटत्या निखाऱया वरून प्रवेश  केला.  वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी डिचोली पोलीसांचेही चांगले सहकार्य लाभले.

Related Stories

माशेल क्रिकेट लीग स्पर्धेचे विठोबा संघाला विजेतेपद

Amit Kulkarni

कोळंब – रिवण भागाला वादळाचा तडाखा

Amit Kulkarni

तृणमूल- मगो युतीचा जाहिरनामा घोषीत

Patil_p

कोविड रूग्णांना रुग्णालयात नेण्यासाठी व ऑक्सजिन सिलिंडर नेण्यासाठी युवक काँग्रेसने सुरु केली वाहने

Amit Kulkarni

मेळावलीवासियांवर अन्याय होऊ देणार नाही

Patil_p

आंतरराष्ट्रीय कॉफी पेंटिंग स्पर्धेत कालिदास सातार्डेकर यांना पुरस्कार

Patil_p
error: Content is protected !!