मुंबई :
वैयक्तिक काळजी उत्पादने बनवणाऱ्या होनासा कंझ्युमरचा समभाग बाजारात मंगळवारी 2 टक्के प्रिमीयमसह लिस्ट झाला आहे. एनएसईवर हा समभाग 330 रुपयांवर सूचीबद्ध झाला आहे. मामाअर्थची ही सहकारी कंपनी आहे. कंपनीने इशु किंमत 324 रुपये इतकी ठेवली आहे. बीएसईवर हा समभाग 334 रुपयांपर्यंत पोहचला होता. सदरचा आयपीओ पात्रताधारक संस्थात्मक खरेदीदारांनी 7.6 पट सबस्क्राइब केला होता. बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 4.02 पट आयपीओ सबस्क्राइब केला होता.