नवी दिल्ली
होंडा कारने आपल्या लोकप्रिय सेडान सिटीच्या आगामी इलेक्ट्रिक हायब्रिड मोटारीचे अखेर उत्पादन सुरु केले आहे. बहुप्रतिक्षित अशी ही आधुनिक वैशिष्टय़ांसहची कार आगामी महिन्यातच लाँच होणार असल्याचे समजते. होंडा कार नवीन हेंडा सिटी ई एचईव्हीला आगामी महिन्याच्या सुरुवातीला बाजारात आणण्याची शक्यता आहे. या गाडीची निर्मिती राजस्थानमधील प्रकल्पात करण्यात येणार आहे. सदरची गाडी आगाऊ बुक करता येणार आहे. ग्राहकांना जवळपास 21,000 रुपये भरून गाडी बुक करता येणार आहे. देशभरातील डिलर्सकडे नवीन होंडा सिटी बुक करण्याची सुविधा मिळणार आहे.