Tarun Bharat

होंडाची सर्वात स्वस्त दुचाकी बाजारात

100 सीसी इंजिन असणाऱ्या दुचाकीची किंमत 65 हजार राहणार : बुकिंग सुविधा सुरु

नवी दिल्ली

 होंडा मोटरसायकल व स्कूटर इंडिया यांच्याकडून बुधवारी आपली सर्वात स्वस्त दुचाकी शाईन 100 सीसी ही बाजारात सादर करण्यात आली आहे. सदरची दुचाकी ही देशातील सर्वात विकल्या जाणाऱ्या हिरो स्प्लेंडर, एचएफ डिलक्स व बजाज प्लॅटिना यांच्या सोबत बाजारात टक्कर देणार असल्याची माहिती आहे.

कंपनीची लोकप्रिय होंडा शाईन ही 125 सीसीची आहे. त्याची सुरुवातीची किमत ही 64,900 रुपये (एक्स शोरुम, मुंबई) आहे. न्यू होंडा शाइनचे बुकिंग बुधवारपासून सुरु झाले आहे. दुचाकीची डिलिव्हरी मे 2023 मध्ये सुरु होणार असल्याची माहिती असून ही गाडी पाच रंगांमध्ये उपलब्ध होणार असल्याची माहिती कंपनीने यावेळी दिली आहे.

चांगल्या मायलेजचा दावा

शाईन 100 मध्ये सर्व नवीन एअर कूल्ड 99.7 सीसी सिंगल सिलेंडर इंजिन आहे. नवीन इंजिन इंजेक्टेड 100 सीसी इंजिन हे अधिकचे मायलेज देण्यास सक्षम राहणार असल्याचा दावाही कंपनीने केला आहे.

नवीन शाइन इ20 इंधनावरदेखील चालणार आहे. यासोबतच यामध्ये हॅलोजन हेडलाईट, साइट स्टॅण्ड इनहिबिटर, एकत्रित ब्रेकिंग सिस्टम राहणार आहे. दुचाकी ही पाच रंगात उपलब्ध होणार असून यामध्ये लाल, निळा, हिरवा, सोनेरी आणि काळ्या बेससह राखाडी पट्टे राहणार आहेत.

या दुचाकींना देणार टक्कर

होंडा शाईन 100 ही गाडी हिरोमोटो कॉर्प या दुचाकीसोबत स्पर्धा करणार आहे. या सेगमेंटमध्ये हिरोची चार उत्पादने आहेत. एचएफ100, एचएफ डिलक्स, स्प्लेंडर प्लस व स्प्लेंडर एक्सटीइसी यांच्यासोबत ही टक्कर राहणार आहे.  आताच्या घडीला होंडाचा ग्रामीण भागात फक्त 3.5 टक्के हिस्सा आहे.

Related Stories

नवी इकोस्पोर्ट एसई दाखल

Amit Kulkarni

ओला ई-स्कूटरच्या ड्रायव्हिंग चाचणीस प्रारंभ

Patil_p

नवी कोरी रेनॉ डस्टर बाजारात

Patil_p

लम्बोर्गिनीची विक्रीत विक्रमी कामगिरी

Patil_p

सणासुदीत प्रवासी वाहन विक्री तेजीत

Patil_p

होंडाची नवी अमेझ बाजारात

Patil_p