देसूर येथील महिलांचे कौतुक, सापडलेले मंगळसूत्र केले परत
प्रतिनिधी/ बेळगाव
ज्याला कष्टाची किंमत असते त्याला प्रत्येक वस्तुची काय किंमत आहे? हे समजते. देसूर येथील शेतकरी महिलांना सापडलेले सोन्याचे गंठण त्यांनी परत करून एक साऱया कष्टकरी महिलांसमोरच आदर्श निर्माण केला आहे. या त्यांच्या कार्याबद्दल देसूर पंचक्रोशीतून कौतुक होत आहे.
शेतामध्ये काम करण्यासाठी महिला जात असताना त्यांना गावात मंगळसूत्र सापडले. शेत मजुरीसाठी या महिला जात होत्या. त्यांना हे मंगळसूत्र सापडले. मात्र त्या महिला भारावून गेल्या नाहीत. हे कोणत्या तरी एका महिलेचे सोन्याचे मंगळसूत्र आहे. त्यामुळे परत केले पाहिजे हे ठरवून त्यांनी गावातील मंडळींना याबाबतची माहिती दिली.
त्यानंतर गावामध्ये सोन्याचे मंगळसूत्र मिळाल्याची दवंडी देण्यात आली. ज्यांचे हे मंगळसूत्र आहे त्यांनी याची ओळख पटवून घेऊन जाण्याचे आवाहन करण्यात आले. त्यानुसार अंगणवाडी शिक्षिका सुनिता मनोहर वाकेकर यांनी हे मंगळसूत्र आपलेच आहे याची ओळख पटवून दिली. त्यानंतर काळसेकर गल्लीतील महिला ईशा गुरव, मनीषा गुरव, शांता नंद्याळकर, सारिका अरगु, माधुरी किणयेकर, अनिता काळसेकर वनिता किणयेकर, सुजाता गुरव, पूजा शिंदे या महिलांनी ते मंगळसूत्र परत केले. यावेळी ग्राम पंचायतचे सेपेटरी ईश्वर गुरव व इतर ग्रामस्थ उपस्थित होते..