Tarun Bharat

मध गोळा करणाऱया मुंग्या

पोटात भरून घेतात मध

मुंग्या आकाराने अत्यंत लहान असल्या तरीही त्यांचा संसार अत्यंत अनोखा असतो. मुंग्यांबद्दल जितके जाणून घ्याल तितके कमी असते. मुंग्यांच्या एका प्रजातीकडून मध गोळा करण्यात येते. या मुंग्यांच्या पोटाचा आकार अनेक पटीने मोठा होतो. त्यांना पाहून ते स्वतःसोबत काहीतरी नेत असल्याचा भास होतो.

या मुंग्यांना हनीपॉट मुंग्या म्हटले जाते. यांच्या पोटात मध भरलेले असते. मधमाशा स्वतःच्या पोळय़ात मध गोळा करतात. तर या मुंग्या स्वतःच्या पोटात मध जमा करतात. याचमुळे मध प्राप्त करू पाहणाऱयांची नजर या मुंग्यांना शोधत असते. मुंग्यांकडून जमा करण्यात आलेले हे मध माणसं सेवन करत असतात. ऑस्ट्रेलियाती लोक हजारो वर्षांपासून या मुंग्यांना शोधून त्यांना खात आहेत. 19990 मध्ये डेव्हिड ऍटनबरोंनी ट्रायल्स ऑफ लाइफ नावाचा एक माहितीपट तयार केला होता, यात या मुंग्यांचा उल्लेख आढळून येतो.

Honeypot Ants storing honey in their abdomen {Myrmecocystus sp} Australia

या मुंग्या स्वतःच्या प्रतिकूल काळासाठी पोटात अन्न साठवत असतात. ज्यासमयी या मुंग्यांकडे अन्न नसते किंवा पोषणाची कमतरता असते, तेव्हा हे पॉट आणि यांची पूर्ण कॉलनी अत्यंत उपयुक्त ठरते. या मुंग्या सर्वांसोबत हे मध शेअर करत असतात. ज्या मुंग्या मध गोळा करतात, त्यांना रेप्लीट म्हटले जाते. मुंग्यांच्या वारुळात प्रत्येक मुंग्यांची एक वेगळी भूमिका असते. हनीपॉट मुंग्या देखील स्वतःची भूमिका बजावत असतात. मुंग्यांच्या या प्रजातीला कॅम्पोनोटस इन्फ्लॅटस म्हटले जाते. ही प्रजाती पश्चिम अमेरिका आणि मेक्सिकोतील काही भागांमध्ये आढळून येतात.

युवा हनीपॉट मुंग्या पिल्लांचे पालन करण्यास मदत करतात, तसेच वारुळ साफ ठेवतात अन् अन्न उपलब्ध करतात. रेप्लीट्स वाळवंटात उगवणाऱया रोपांपासून मध गोळा करतात आणि यांच्या मधात प्रोटीन अन् फॅट असते. मध गोळा करण्यासह या मुंग्यांचा आकार बदलत जातो. या मुंग्यांचे पोट पूर्णपणे भरल्यावर मधासाठी जागा शिल्लक राहत नाही. यांचे पोट एखाद्या लहान फुग्यासारखे दिसू लागते.

Related Stories

सौरमंडलाच्या बाहेर पृथ्वींची रेलचेल

Patil_p

गवंडीकाम करणारी युवती ब्रँड ऍम्बेसिडर

Patil_p

दिव्यांग व अनाथ मुलांसाठी बाल आनंद मेळावा रविवारी

prashant_c

झोपण्याचा विक्रम : 6 लाख कमावले

Patil_p

सर्वाधिक दीर्घायुषी श्वानाचा सत्कार

Amit Kulkarni

गुगलचे पद्मश्री आरती साहा यांच्या जयंतीनिमित्त खास डूडल

Tousif Mujawar