प्रतिनिधी /बेळगाव
कर्नाटक विज्ञान आणि तंत्रज्ञान अकादमीने (केएसटीए) बेळगावच्या नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ मेडीसीनचे संचालक डॉ. सुबर्णा रॉय यांना 2022 वर्षासाठी प्रति÷sची फेलोशीप जाहीर केली आहे. पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार प्रा. अजय सुद तसेच विज्ञान व तंत्रज्ञान तसेच कौशल्य विकास मंत्री डॉ. अश्वथनारायण यांच्या उपस्थितीत ही फेलोशीप देण्यात आली.
डॉ. सुबर्णा रॉय यांचे संसर्गजन्य रोगामध्ये विशेष संशोधन आहे. 2009 मध्ये त्यांनी संसर्गजन्य संशोधन प्रयोगशाळा आयसीएमआर येथे सुरू केली. डायरिया, कॉलरा, डिफ्थेरिया, हिपेटायटीस याबाबत संशोधन केले. यामुळे वैद्यकीय महाविद्यालये व आरोग्य संस्थांना मार्गदर्शक प्रणाली तयार करणे आणि रोगावर नियंत्रण आणणे सुकर ठरले.
बेळगाव आणि अन्य जिह्यांमध्ये कोविड-19 प्रयोगशाळा उभारणीसाठीही त्यांनी पुढाकार घेतला. सरकारच्या सहयोगाने डॉ. सुबर्णा रॉय यांनी रायचूर जिह्यातील सिरवर येथे मॉडेल रुरल हेल्थ रिसर्च युनिटची स्थापना केली. या ठिकाणी गरिबांवर उपचार करण्यात येतात. डॉ. रॉय यांनी अनेक विद्यार्थ्यांना व व्यावसायिकांना डॉक्टरेटसाठी मार्गदर्शन केले. मुलांमध्ये होणाऱया डायरियाचे कारक घटक ‘ह्यूमन पॅरेकोवायरस’ आहे हे सिद्ध करणारे पहिले शास्त्रज्ञ आहेत.
कोरोना काळात त्यांनी परिणामकारक पारंपरिक औषध शोधून रिव्हर्स कार्मकोलॉच्या साहाय्याने आणि हर्बल इन्फॉर्मेटिक्सच्या उपयोगाने उपचार केले. 2021 मध्ये डॉ. रॉयना केंद्र सरकारच्या आरोग्य संशोधन विभागातील आरोग्य संशोधन वैज्ञानिक केडरमध्ये सायंटिस्टजी आणि आयसीएमआर नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ ट्रेडिशनल मेडिसिनचे संचालक म्हणून त्यांची नियुक्ती केली आहे. त्यांच्या कामगिरीबद्दल त्यांना ही फेलोशीप देण्यात आली.