Tarun Bharat

विश्वनाथ मांजरेकर यांचा निसर्ग विकास जनकल्याण संस्थेच्यावतीने सन्मान

Honored by Vishwanath Manjrekar on behalf of Nisarga Vikas Jankalyan Sanstha

जैवविविधता, पर्यावरण आणि वनौषधी क्षेत्रात गेल्या पाच दशकाहून अधिक वर्षे उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल सावंतवाडी येथील विश्वनाथ रामचंद्र मांजरेकर यांचा निसर्ग विकास जनकल्याण संस्थेच्यावतीने सन्मान करण्यात आला.यावेळी निसर्ग विकास जनकल्याण संस्थेचे अध्यक्ष डॉ दिलीप पानवलकर, प्रसिद्ध स्त्रिरोग तज्ञ डॉ त्र्यंबक लेले, अनिल पालव (कुडाळ), प्रभाकर गावकर (ओटवणे) अनिरुद्ध गावडे, बंटी परब (सावंतवाडी), विद्याधर मांजरेकर आदी उपस्थित होते.


निसर्ग विकास जनकल्याण संस्था गेल्या वीस वर्षांपासून कार्यरत असून पर्यावरणासह वन औषधींचे रक्षण करून त्यांचा प्रसार व प्रचार करण्याचे काम करत आहे. तसेच गोपालन करून गोपालकांचा सन्मान करत आहे. निसर्गाचे महत्त्व पटवून देताना सेंद्रिय शेतीचाही प्रचार करत आहे. यात विश्वनाथ मांजरेकर यांचाही सक्रिय सहभाग आहे. त्यांच्या या कार्याबद्दल डॉ त्र्यंबक लेले यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी विश्वनाथ मांजरेकर यांच्या कार्याचे कौतुक केले. यावेळी विश्वनाथ मांजरेकर यांचे सुपुत्र विद्याधर मांजरेकर यांनी संस्थेला यापुढे सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.

ओटवणे / प्रतिनिधी

Related Stories

दीक्षा सावंत हिच्या प्रामाणिकपणाचे सर्व स्तरातून कौतुक

Tousif Mujawar

नेमळेतील बेपत्ता युवकाची आत्महत्या

NIKHIL_N

‘आत्मनिर्भर’च्या वाटेवरील चटके!

NIKHIL_N

”मतदारांना फसवणाऱ्या राजकीय पक्षांचे चिन्ह रद्द करा”

Abhijeet Khandekar

जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत आरपीडी हायस्कूलचे यश

Anuja Kudatarkar

प्रतीक्षेतील जिल्हांतर्गत शिक्षक बदल्यांना मिळाला मुहूर्त

Patil_p