Tarun Bharat

अशोक नायगावकर यांचा सत्कार

प्रतिनिधी /बेळगाव

मराठी साहित्यातील ज्येष्ट कवी अशोक नायगावकर हे आज पंचाहत्तरीत पदार्पण करत आहेत. बेळगावमध्ये रविवारी त्यांचा आणि महेश केळुसकर यांचा ‘मस्करीका’ हा कार्यक्रम लोकमान्य रंगमंदिर येथे रसिकांच्या लक्षणीय उपस्थितीत पार पडला. यावेळी तरुण भारतचे समूहप्रमुख व सल्लागार संपादक किरण ठाकुर यांच्या हस्ते अशोक नायगावकर यांचा भव्य सत्कार करण्यात आला.

महाराष्ट्रात, मुंबईमध्ये विविध संस्थांच्यावतीने नायगावकर यांचा सत्कार होत आहे. या ज्येष्ट कवीच्या सत्काराचा पहिला मान बेळगावकरांना लाभला. किरण ठाकुर यांच्या हस्ते गुलाब फुलांचा भव्य हार, शाल, लामण दिवा देऊन नायगावकर यांचा सत्कार करण्यात आला. सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करतानाच बेळगावबद्दल आपल्याला विशेष जिव्हाळा असल्याचे नायगावकर म्हणाले. 

Related Stories

तिन्ही भाषांमधून परिपत्रके द्या

Amit Kulkarni

खानापूरच्या संत बसवेश्वर चौकात महामानव जागृती फलकाचे अनावरण

Omkar B

गवळी गल्लीला हॉटस्पॉट घोषित केल्याने गवळी बांधवांवर अन्याय

Patil_p

पहिल्या टप्प्यात लसीसाठी 15 हजार जणांची यादी

Omkar B

भूमिगत कचराकुंडय़ासाठी 41 लाखाच्या निविदा

Amit Kulkarni

येळ्ळूरमध्ये आजपासून कडक अंमलबजावणी

Amit Kulkarni