Tarun Bharat

संत गाडगेबाबा भवन येथे विद्यार्थ्यांचा गौरव

Advertisements

बेळगाव : संत गाडगेबाबा भवन येथे समाजातील माजी सैनिकांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी समाजातील 10 वी आणि 12 वी परीक्षेत पहिला, दुसरा व तिसरा क्रमांक पटकाविलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले. तसेच 11 वीपासून पुढे शिक्षण घेणाऱया सर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप करण्यात आली. अध्यक्षस्थानी समाजाचे अध्यक्ष विठ्ठल पाळेकर होते. सेपेटरी राजू यादव यांनी स्वागत केले. महिला मंडळाने स्वागतगीत सादर केले. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समाजाचे अध्यक्ष व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. सूत्रसंचालन संस्थेचे संचालक जोतिबा उपर्डेकर यांनी केले. प्रास्ताविक विनायक जाधव यांनी केले. बक्षीस समारंभाचा कार्यक्रम उपसेपेटरी सदानंद साळुंके यांनी केला. मंगेश पाळेकर यांनी आभार मानले.

Related Stories

कॅम्पमध्ये जलवाहिनीला गळती

Amit Kulkarni

कोल्हापूर-तिरुपती हरिप्रिया एक्स्प्रेस फुल्ल

Amit Kulkarni

जायंट्स मेनकडून सीमोल्लंघन मैदानाची स्वच्छता

Amit Kulkarni

चाळीस हजार मालमत्तांची नोंद नाही!

Amit Kulkarni

शिवानी भोसले यांना आंतरराज्य पुरस्कार जाहीर

Patil_p

झोया टेभला हिचे ‘नीट’मध्ये घवघवीत यश

Omkar B
error: Content is protected !!