बेळगाव बार असोसिएशनच्यावतीने आयोजन : पुढील कार्यासाठी दिल्या शुभेच्छा
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव जिल्हय़ामध्ये कार्यरत असलेल्या न्यायाधीशांची इतरत्र बदली झाली. त्या न्यायाधीशांचा सत्कार करण्यात आला. याचबरोबर त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. जुन्या लायब्ररीच्या सभागृहामध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. प्रभू यत्नट्टी होते.
मुख्य जिल्हासत्र न्यायालयाचे न्यायाधीश सी. एम. जोशी यांची बदली बेंगळूरला झाली. याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी बेळगावमध्ये केलेल्या कामांचा अनुभव व्यक्त केला. येथील वकिलांनी जे आम्हाला सहकार्य केले त्याबद्दल त्यांचे आभारी असल्याचे त्यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले. बेळगाव हे शहर शांततेचे शहर आहे. येथील हवामानदेखील चांगले आहे. याचबरोबर येथील बार असोसिएशन तसेच वकिलांनी जे सहकार्य केले ते मी कधीच विसरू शकणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
याचबरोबर पहिले अतिरिक्त जिल्हासत्र न्यायालयाचे न्यायाधीश बसवराज, चौथे अतिरिक्त जिल्हासत्र न्यायालयाचे न्यायाधीश नेरली व्ही. व्ही., तिसरे अतिरिक्त जिल्हासत्र न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत तावरे, सहावे अतिरिक्त जिल्हासत्र न्यायालयाच्या न्यायाधीशा संध्याराव पी., आठवे अतिरिक्त जिल्हासत्र न्यायालयाचे न्यायाधीश हेमंतकुमार सी. आर., दहावे अतिरिक्त जिल्हासत्र न्यायालयाचे न्यायाधीश व्यंकटेश, लोकअदालतीचे जिल्हा सचिव आणि न्यायाधीश विजय देवराज अर्स, पहिले अतिरिक्त दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश परशुराम दोडमनी, जेएमएफसी तृतीय न्यायालयाच्या न्यायाधीशा गायत्री काटे, जेएमएफसी चतुर्थ न्यायालयाचे न्यायाधीश शंभूलिंगय्या मुदीमठ, जेएमएफसी द्वितीय न्यायालयाच्या न्यायाधीशा लताश्री बी. व्ही., जेएमएफसी सहावे न्यायालयाचे न्यायाधीश विनायक विठ्ठल कुंदापूर, सातवे अतिरिक्त दिवाणी व जेएमएफसी न्यायालयाच्या न्यायाधीशा विनुता बी. एस., आठवे अतिरिक्त दिवाणी न्यायालयाच्या न्यायाधीशा चैत्रा कुलकर्णी या सर्वांची बदली झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
याचबरोबर बेळगाव बार असोसिएशनचे सदस्य आणि न्यायाधीश ए. बी. कट्टी हे निवृत्त झाल्याबद्दल त्यांचादेखील यावेळी सत्कार करण्यात आला.
यावेळी बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ऍड. सचिन शिवण्णावर, उपाध्यक्ष ऍड. सुधीर चव्हाण, जनरल सेपेटरी गिरीराज पाटील, जॉईंट सेपेटरी ऍड. बंटी कपाई, सदस्य ऍड. महांतेश पाटील, ऍड. अभिषेक उदोसी, ऍड. आदर्श पाटील, ऍड. इरफान बयाळ, ऍड. पी. के. पवार, महिला प्रतिनिधी ऍड. पूजा पाटील आणि ज्ये÷ वकील तसेच इतर वकील उपस्थित होते.