दीपोत्सव,‘गजर टाळ-मृदंगांचा’ कार्यक्रम : स्पर्धेत 38 भजनी मंडळांचा सहभाग
प्रतिनिधी / बेळगाव
श्री क्षेत्र दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिर आणि इन्फिनिटी फिल्म प्रॉडक्शन यांच्यामार्फत आयोजित केलेल्या भजन स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ बुधवारी पार पडला. सालाबादप्रमाणे कार्तिक अमावास्येनिमित्त लोणी पूजा, भव्य दीपोत्सव आणि गजर टाळ-मृदंगाचा कार्यक्रम झाला. यामध्ये वारकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. सुनील बाळेकुंद्री, अभिजीत चव्हाण यांच्या हस्ते आरती करण्यात आली.
यावेळी ग्रंथदिंडी काढण्यात आली. यामध्ये बालिका आदर्श विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता. विठ्ठल-ऊक्मिणी पूजन चिक्कमंगळूर दत्तात्रय मठाचे मठाधीश अशोक शर्मा यांच्या हस्ते झाले. त्यानंतर हरिपाठ झाला. भजन स्पर्धेत 38 भजनी मंडळांचा सहभाग होता. विजेत्या भजनी मंडळांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी गायत्री मंडोळकर, विनायक मणगुतकर, प्रसाद बाचुळकर, विवेक पाटील यासह ट्रस्टी, महिला, सेवेकरी उपस्थित होते.
यावेळी विजेत्या मंडळांना अनुक्रमे 25 हजार, 20 हजार, 15 हजार व 10 हजार ऊपये यासह उत्कृष्ट टाळ, मृदंग, तबला आणि गायकांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. या भजन स्पर्धेत बेळगाव, खानापूर, चंदगड, आजरा यासह कोल्हापूर, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतून भजनी मंडळे दाखल झाली होती.
भजनी मंडळांचा गौरव
या भजन स्पर्धेत प्रथम पेठ वडगाव (कोल्हापूर) येथील श्री माउली भजनी मंडळ, द्वितीय हंदिगनूर येथील श्री धळेश्वर भजनी मंडळ, तृतीय व्हन्नाळी (ता. कागल) येथील श्री माउली भजनी मंडळ, चौथा कुद्रेमनी येथील श्री विठ्ठल-ऊक्मिणी भजनी मंडळ, पाचवा क्रमांक कंग्राळी खुर्द येथील स्वरानंद कला मंच भजनी मंडळाने पटकाविला. उत्तेजनार्थ वारणा (कोल्हापूर) येथील राधा गोविंद भजनी मंडळ, माणगाव येथील म्युझिक अॅण्ड फिल्म प्रॉडक्शन, अडकूर येथील रवळनाथ भजनी मंडळ, शास्त्राrनगर येथील श्री माउली महिला भजनी मंडळ, मौजे कार्वे येथील श्रीदेव कलमेश्वर भजनी मंडळ यासह वैयक्तिक उत्कृष्ट तबला, मृदंग, गायक, भजनी मंडळ आदींना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.