नवी दिल्ली
एचओपी इलेक्ट्रिक मोबिलिटीने भारतीय बाजारात आपली नवीन इलेक्ट्रिक दुचाकी एचओपी ओएक्सओ सादर केली आहे. सदरची दुचाकी ही एका चार्जिंगवर तब्बल 150 किमी पर्यंत धावणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे. सदरची गाडी ही दोन मॉडेलमध्ये उपलब्ध होणार असून यामध्ये जिओ फेसिंग, ऍन्टी थेफ्ट सिस्टम यासारख्या फिचर्सची सुविधा मिळणार आहे. याची सुरुवातीची किमत ही 1,24,999 रुपये राहणार आहे.
अन्य बाबी…
w सदरच्या दुचाकीत एकूण चार राइडिंग मॉडेल्स
w यामध्ये ईको, पावर, स्पोर्ट्स आणि टर्बोचा समावेश राहिल
w गाडी 4 सेकंदामध्ये 0 ते 40 किमी वेगाने धावणार
-4 तासांपेक्षा कमी कालावधी 80 टक्के बॅटरी होणार चार्ज
-4जी कनेक्टीव्हीटीसह अन्य फिचर्स मिळणार