Tarun Bharat

Satara : बोरगाव पोलिसांच्या पथकावर हरपळवाडीत जमावाचा भीषण हल्ला

नागठाणे प्रतिनिधी

दरोड्यातील संशयितांना पकडण्यासाठी गेलेल्या बोरगाव पोलिसांच्या ताफ्यावर कराड तालुक्यातील हरपळवाडीत येथे जमावाने भीषण हल्ला केला. या हल्ल्यात दोन अधिकाऱ्यांसह कर्मचारी जखमी झाले. तर पोलिसांच्या गाडीची तोडफोडही करण्यात आली. मंगळवारी रात्री उशिरा ही घटना घडली.

बोरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अतीत गावच्या इमर्सन कंपनीजवळ मंगळवारी सायंकाळी एका युवकास दुचाकीवरून आलेल्या काही युवकांनी मारहाण करत त्याकडे रोख रकमेसह ३० हजार रुपयांचा मुद्देमाल लुटला होता. यांची फिर्याद बोरगाव पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. यातील संशयित कराड तालुक्यातील हरपळवाडीत असल्याचे समजल्यावर त्यांना पकडण्यासाठी बोरगाव पोलीस ठाण्याचे सपोनि चेतन मछले यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक सुनील ढाणे, कर्मचारी व होमगार्ड गेले असता संशयिताने गावातील ग्रामस्थांना बोलावून पोलीस पथकावर हल्ला केला. यामध्ये पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचारी जखमी झाले. यावेळी पोलिसांच्या गाडीचीही मोडतोड जमावाने केली. या स्थितीतही बोरगाव पोलिसांनी योगेश बाळू संकपाळ, उद्धव शिवाजी काळभोर, शहाजी खंडेराव काळभोर व अमोल बाळासो पवार यांना ताब्यात घेतले. याप्रकरणी उंब्रज पोलीस ठाण्यात या चौघाबरोबरच अज्ञात १७ जणांविरोधात कलम ३५३ सह अन्य कलमा नुसार तर बोरगाव पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Stories

जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी नितीनकाका पाटील

Patil_p

जिल्हय़ात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची गती वाढली

Patil_p

लाडक्या बाप्पांना दिला निरोप

Patil_p

सातारा : घरकुलातील पाण्याने घेतला एकाचा बळी

datta jadhav

तपास अधिकाऱ्यांना अडकवून तो देखील अडकला, करोडोंचा भ्रष्टाचार करणारा कांबळे गजाआड

Archana Banage

वाईत बंगल्यात गांजाचा साठा जप्त

Patil_p