प्रतिनिधी/ सातारा
मागील काही दिवसांपासुन जनावरांमध्ये लम्पी या संसर्गजन्य आजारामध्ये वाढ दिसुन येत आहे. हा आजार विशेषतः गाय, म्हैस व बैल या पशुधनांमध्येच आढळुन येत आहेत. याआजाराच्या प्रादुर्भावामुळे जिल्हय़ात दोन पशुधनांचा मृत्यू ही झाला आहे. याच अनुशंगाने सुरक्षिततेच्या दृष्टीने सदरबाजार येथील दोन बीफ विक्रीची दुकाने सातारा पालिकेच्यावतीने सील करण्यात आली आहेत. तसेच बीफ विक्रीवर बंदी असुन ही त्याची विक्री करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले.
त्यानुसार येथील मदिना आणि बिस्मिल्ला या दोन हॉटेलमध्ये जनावरांचे मांस दिले जात असल्याची माहिती मिळाल्याने. सातारा पालिकेच्या भरारी पथकाकडून या हॉटेलची तपासणी करण्यात आली. दोन्ही हॉटेल मालकांकडे बीफचे मांस विक्रीचा कोणताही परवाना नसताना आणि हॉटेलमध्ये जनावरांचे मांस विक्रीला बंदी असताना या हॉटेलमधून मांस विक्री केली जात असल्याने निदर्शनास आले. सातारा पालिकेकडून दोन्ही हॉटेल सील करण्याची कारवाई करण्यात आली.
ही कारवाई अतिक्रमण हटाव विभागाचे प्रमुख प्रशांत निकम, वरिष्ठ आरोग्य निरिक्षक प्रकास राठोड यांच्या पथकाने केली. सध्या लम्पी या आजाराने थैमान घातला असुन, त्याअनुशंगाने पशुविभागाच्यावतीने जिल्हय़ातील सर्व पशुधनांचे लसीकरण ही करण्यात येत आहे. पण एकंदरीत परिस्थिती पाहता लम्पी आजाराची लागण होणाऱया पशुधनाची संख्या ही तितकीच होत आहे. यामुळे पालिच्यावतीने ही जनजागृती या आजाराबाबत जनजागृती ही करण्यात येत आहे.