Tarun Bharat

घरफोडी करणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद ; विटा पोलिसांची कारवाई

Advertisements

विट्यात घरफोडी करणाऱ्या तीन संशयित आरोपींना पकडण्यात विटा पोलिसांना यश आले आहे. प्रतिक ऊर्फ नयन शंकर जाधव (२१, रा. वाघेश्वर, पो. मसूर, ता. कराड), गौतम प्रकाश माळी (२१, रा. मायणी, ता. खटाव) , अनिकेत अधिकराव गायकवाड (२२, रा. निहीरवाडी रहिमतपूर, ता. कोरेगाव) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून नऊ लाख ७२ हजार ९४० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी दिली.

डोके यांनी दिलेली माहिती अशी, कदमवाडा येथील संदीप हरिभाऊ शितोळे यांच्या घरी चोरी झाल्याची फिर्याद १४ फेब्रुवारी रोजी विटा पोलिसांत दिली होती. त्यानुसार गुन्ह्याचा तपास सुरू होता. १५ जुलै रोजी पेट्रोलिंग करीत असताना खबऱ्याकडून घरफोडी करणारे संशयित कडेगाव एमआयडीसीमध्ये अनिकेत पवार यांच्या रूममध्ये भाड्याने राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार छापा टाकत पोलिसांनी संशयित गौतम माळी आणि प्रतिक ऊर्फ नयन जाधव यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी अन्य एक साथीदार अनिकेत गायकवाड याच्यासोबत मिळून घरफोडी केल्याचे कबूल केले आहे. संशयित आरोपींकडून दोन एलईडी टीव्ही, एक फ्रीज, वॉशिंगमशीन, प्रोजेक्टर, टीपॉय, चांदीचे दागिने आणि नऊ लाख रूपये किंमतीची चारचाकी असा एकूण नऊ लाख ७२ हजार ९४० रूपयांचा मुद्देमाल जप्त केल्याचे पोलिसांनी सांगितले.

Related Stories

कृषी सुधारणा विधेयक पुस्तिकेचे फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन

Archana Banage

सागरेश्वरमधील वन्यप्राण्यांच्या बंदोबस्तासाठी 27 ला बैठक

Abhijeet Khandekar

video : कोरोना रूग्णांचे मनोबल वाढवण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांचा भन्नाट डान्स !

Archana Banage

सांगली : आमणापूर येथे विजेच्या धक्क्याने बालकाचा मृत्यू

Archana Banage

सीपीआर,गडहिंग्लज रुग्णालयात अत्याधुनिक बालरोग कक्ष

Abhijeet Khandekar

कडकनाथ कोंबडी प्रकरणात कुंभोज परिसरातील शेतकऱ्यांचे कोट्यावधीचे नुकसान

Archana Banage
error: Content is protected !!