चुये / प्रतिनिधी
चुये, ता. करवीर येथे दुमजली घराला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याने सपूर्ण घर व प्रापचिक साहित्य जळून खाक झाले . त्यामुळे तब्बल चार लाखाचे नुकसान झाले आहे. एकही वस्तू भडकलेल्या आगीपासून वाचू शकली नाही .
बंडा धोंडी कांबळे यांचे दगडमाती व लाकडी रुपकाम असलेले दुमजली घर कांबळे गल्लीमध्ये आहे. सकाळी नऊच्या सुमारास घरातून अचानक धूर येऊ लागल्याचे निदर्शनास आले घरात काहीतरी वस्तू पेटली असेल असा सर्वांचा अंदाज झाला मात्र थोड्याच वेळाने त्या धुराचा रूपांतर मोठ्या आगीत झाले. बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केले त्यामुळे घरातील सर्व प्रापंचिक साहित्य कपडे फ्रीज टीव्ही यास सर्व साहित्य जळून खाक झाले.
ग्रामस्थाचे प्रयत्न निष्फळ ठरले.
घराला आग लागल्याचे समजताच गावातील गावातील विशेषता युवकांनी आग विजवण्याचा प्रयत्न केला, मात्र आगीची तीव्रता वाढल्यामुळे सर्वांचे प्रयत्न निष्फळ ठरले.
होत्याचं नव्हतं झालं …
बंडा धोंडी कांबळे हे महसूल खात्याचे निवृत्त कर्मचारी आहेत .त्यांचा एकुलता एक मुलगा दोन वर्षांपूर्वी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निघून गेला त्यामुळे कुटुंबाचा आधार गेल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर पसरला होता त्यातून सावरून या परिवाराने परिस्थितीशी दोन हात करत जीवनक्रम मार्गस्थ केला होता. मात्र नियतीची दृष्ट पुन्हा लागली. कुटूंबाने कष्टाने उभे केलेल्या घराला शॉर्ट सर्किटने पेट घेतला आणि संपूर्ण घरचं आगीने व्यापले. त्यामुळे काही क्षणात होत्याच नव्हत झाल्याचे दृष्य पाहण्याचे दुदैव्य कांबळे परिवारावर आले. या दुदैवी घटनेने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
अन्य घरे वाचली …
घराला आग लागल्याचे कळताच तात्काळ अग्नीशामक विभागाला कळविण्यात आले. अग्नीशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी विशेष प्रयत्न करून आग विझवली. तसेच स्थानिक वायरमन यांनी तात्काळ विजपुरवठा बंद केला. त्यामुळे इतर घरांना आगीचा धोका झाला नाही. त्यामुळे इतर घरे वाचली. घटना घडल्यानंतर विजवितरणच्या वडकशिवाले उपकेंद्राचे कनिष्ट अभियता पृथ्वीराज घोडके सुभाष पाटील वायरमन मारुती सुतार राहूल गुरव यांनी भेट दिली. तसेच महसुल विभागाकडून नुकसानीची माहिती घेण्यात आली.