Tarun Bharat

पावसामुळे शहरात घरांची पडझड

Advertisements

प्रतिनिधी /बेळगाव

मुसळधार पावसामुळे सोमवारपासून घरांच्या पडझडीच्या घटना घडू लागल्या आहेत. भारतनगर-शहापूर, आंबेडकर कॉलनी, अनगोळ येथे घरे कोसळली होती. त्यानंतर सोमवारी रात्रीही काही घरे कोसळली आहेत. सुदैवानेच या घटनांमध्ये कोणीही जखमी झाले नाही.

ब्रह्मनगर-मजगाव येथील रहिवासी संजय रामचंद्र भोसले यांचे घर मंगळवारी पहाटे कोसळले. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही. ब्रह्मनगर परिसरात अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने साऱयांचीच तारांबळ उडाली होती. काही दिवसांपूर्वीच घर धोक्मयाचे बनल्यामुळे संजय भोसले व त्यांचे कुटुंबीय भाडोत्री घरात राहत होते. त्यामुळे सुदैवाने मोठा अनर्थ टळला.

कामत गल्ली-बेळगाव येथेही घर कोसळले असून मोठे नुकसान झाले आहे. मंगळवारी पहाटे सुनील व अनिल बडमंजी यांच्या मालकीचे घर कोसळले. जवळपास 2 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. याचबरोबर काही घरांच्या भिंतीही ढासळल्या असून त्या घरांतील नागरिकांना इतरत्र हलविले आहे. माळी गल्ली येथील लंगरकांडे यांचे घर कोसळले आहे. मातीच्या ढिगाऱयाखाली जीवनावश्यक वस्तू तसेच इतर साहित्याचे नुकसान झाले आहे. जवळपास 6 ते 7 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्तांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.

Related Stories

शांततेला सुरूंग लावणाऱयांना अद्दल घडवा

Patil_p

गुरूवारी कोरोना रुग्ण संख्येने पार केला 800 चा आकडा

Rohan_P

चव्हाट गल्लीत वाहतूक कोंडी

Rohan_P

धारवाडमध्ये शेतकऱयांचा ट्रक्टर मोर्चा

Patil_p

विजय आमचाच, आमिषाला बळी पडू नका!

Amit Kulkarni

तहसीलदार कार्यालयात सात-बारासाठी नागरिकांची गर्दी

Amit Kulkarni
error: Content is protected !!