रशिया-युक्रेन युद्धाने अनेक लोकांना जीवनातील सर्वात दुःखद दिवस अनुभवण्यासाठी भाग पाडले आहे. कशाप्रकारे तरी जीव वाचवून पलायन केलेले युक्रेनचे हजारो लोक मेट्रो स्थानकावरच तळ ठोकून आहेत. यातील अनेक जण तर रेल्वेच्या डब्यांमध्ये राहत आहेत. खारकीव्हमध्ये हल्ले सुरू झाल्यावर सुमारे 14 लाख लोकांनी घर सोडून पलायन केले आहे.
युद्धाच्या दहशतीने युक्रेनमधील मेट्रोस्थानकांचे चित्रच बदलले आहे. खारकीव्हच्या मेट्रो स्थानकात छोटय़ा छोटय़ा कोपऱयात कुणी लॅपटॉप आणि की-बोर्ड घेऊन ऑफिसचे काम करतोयर, तर कुणी जमिनीवर चटई अंथरून झोपलेला दिसून येतो.
तसेच या स्थानकात आश्रय घेतलेल्या मुलांसाठी येथील रेल्वेचे डबेच त्यांची शाळा आणि क्रीडामैदान ठरले आहेत. मागील 2 महिन्यांपासून ही मुले येथेच राहत आहेत. या मुलांना आता युद्धाची भीती फारशी वाटत नाही. युद्ध सुरू असूनही युक्रेनमधील 90 टक्के शाळा ऑनलाईन सुरू आहेत हीच एकमात्र दिलासादायक बाब आहे.
मेट्रोस्थानकावर राहणाऱया लोकांचे जग येथेच मर्यादित झाले आहे. मदतसामग्री, धान्य आणि भाज्यांचा साठा एकाबाजूला, मुलांसाठी वाचनालय दुसऱया बाजूला तर मोठय़ांसाठीची पुस्तके वेगळय़ा ठिकाणी ठेवण्यात आली आहेत.