Tarun Bharat

सोमवारीच फेरीबोट नादुरुस्त कशी होते?

Advertisements

चोडण रायबंदर जलमार्गावर नियमित प्रवास करणाऱयांना पडलेला प्रश्न

वार्ताहर /जुने गोवे

 चोडण रायबंदर जलमार्गावरील पांच पैकी एक फेरी बोट आज सकाळी नादुरुस्त झाल्याने दुचाकी व चारचाकी वाहन धारकांना खुपच त्रास सहन करावे लागले. काही जणांना तर तास- दीड तास रांगेत थांबावे लागले. अर्धा कि. मी. पर्यंत चार चाकी वाहनांची रांग लागलेली होती.                                                               

हल्लीच्या दिवसांत जवळ जवळ प्रत्येक सोमवारी च एक फेरी बोट नादुरुस्त असते म्हणून प्रवासी संताप व्यक्त करीत होते. आता ही बाब नित्याची च झाली असून नदी परिवहन खात्याने आता सहावी फेरी बोट राखीव म्हणून या जलमार्गावर ठेवावी अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. म्हणजे पांच पैकी एक फेरी बोट नादुरुस्त झाल्यास ताबडतोब राखीव फेरी बोट सुरू करता येईल. नदी परिवहन खात्याच्या मंत्र्यांनी याची दखल घेऊन नदी परिवहन खात्याच्या अधिकाऱयांना योग्य आदेश द्यावेत.

Related Stories

पणजी महापालिकेकडून गणेश चतुर्थीसाठी एसओपी

Amit Kulkarni

संकटावर मात करण्यासाठी सर्व रेती व्यवसायिकांनी एकत्र यावे

Patil_p

10 वी, 12 वी परीक्षा वेळापत्रकांचा कार्यक्रम जाहीर

Amit Kulkarni

कुंकळ्ळीत ‘स्टेप-अप इस्पितळ’ स्थापण्याची तयारी

Patil_p

काँग्रेसचे धोरण सामान्य लोकांपर्यंत पोहोचवा

Amit Kulkarni

‘ऑनलाईन’साठी नेटवर्कच्या शोधात विद्यार्थी अरण्यात

tarunbharat
error: Content is protected !!