Tarun Bharat

‘शेतकर्‍यांच्या‘‘ इंधनावर पळणार देशी गाडया..!

प्रत्येक गाडीचे इंजिन एकतर पेट्रोल, डिझेल किंवा सीएनजी अशा एकाच इंधनाच्या वापरावर चालणारे असते. आता अशा एका इंजीनचा शोध लावण्यात आला आहे. ज्यामुळे गाडीत दोन वेगळे इंधन घातल्यानंतरहि इंजीन अगदी दमात चालनार यात शंकाच नाही. त्याला म्हणतात फ्लेक्स इंजीन.

पण फ्लेक्स इंजिन काय करणार आहे ?

समजा तुमची पेट्रोलची गाडी असेल तर हे इंजिन 100 टक्के पेट्रोल किंवा 100 टक्के इथेनॉलवर चालू शकेल. त्यासाठी तुम्हाला काहि कुठे बटन दाबायला नको, गाडीत काय भरलंय ते इंजिनला कळेल आणि त्यानुसार ते काम करेल. डिझेलची गाडी असेल तर डिझेल आणि बायो-डिझेल यापैकी एकावर ते चालू शकेल.

Advertisements

टोयोटा कंपनीने घेतला पुढाकार ?

6 ते 8 माfहन्यांत कार उत्पादकांनी प्लेक्स फ्यgएलवर चालू शकणारी इंजिन आपल्या गाडय़ांमध्ये बसवावी असं सरकार म्हणतंय. टोयोटा कंपना अशी इंजिन्स तयार करणार आहेत.

फ्लेक्स इंजिन : फायदे काय-तोटे काय?

सध्या पेट्रोलचा भाव 100 रुपयांच्यावर आहे. 2030 पर्यंत पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल ब्लेbडिंग आणि डिझेलमध्ये 5% बायोडिझेलचं ब्लेbडिंग करण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे. यातून काय काय होईल?

पैशाची बचत –

भारत सध्या 8 लाख कोटी रुपयांचं पेट्रोलियम प्रॉडक्ट्स आयात करतो. पुढच्या काहि वर्षांत हे 25 लाख कोटी रुपयांवर जाईल. हा खर्च कमी करण्यासाठी यात मदत होऊ शकेल.

प्रदूषण कमी –

इथेनॉलची पेट्रोलशी तुलना केलीत तर त्यातून होणारं प्रदूषण कमी आहे. अमेरिकेच्या डिपार्टमेंट ऑफ इनर्जीच्या ऑल्टरनेटिव्ह फ्यgएल्स डेटा सेंटरच्या म्हणण्यानुसार मक्यातून बनणार्‍या इथेनॉलमुळे हरित गृह वायूचे उत्सर्जन 34 टक्के कमी होतं.

तांत्रिकदृष्ट्या सोपं –

ऑल्टरनेटिव्ह फेयूल डेटा सेंटर म्हणतं की पेट्रोलवर चालणारं इंजिन अल्प प्रमाणात इथेनॉल मिसळलेल्या पेट्रोलचाही नीट वापर करू शकतं. इथेनॉलचं प्रमाण वाढवत जरी नेलं तरी इंजिनमध्ये काहि मामुली बदल करून काम होऊ शकतं. त्यासाठी पूर्णपणे वेगळय़ा रचनेची गरज असते असं नाही. पण अर्थात याच्यात काहि अडचणीहि आहेत.

ऍव्हरेजच काय ? –

इथेनॉलवर आधारलेली इंधनं हि पेट्रोल-डिझेलपेक्षा कमी ऊर्जा देतात. म्हणजे 1 किलोमीटर अंतरासाठी तुम्ही जितकं पेट्रोल किंवा डिझेल जाळात त्याच्या तुलनेत जास्त इथेनॉल तुम्हाला लागेल.

उपलब्धता –

आताच्या घडीला भारतात वाहतुकीसाठी जैवइंधनाची उपलब्धता आणि वापर हे दोन्हीहि मर्यादित आहे. जसे पेट्रोल पंप आहेत तसे इथेनॉल पंप सर्रास दिसतात का ? तर नाहि. पण सरकारचं म्हणणं आहे की येत्या काळात ती उपलब्धता वाढवण्यावर त्यांचा भर आहे.

2025 पर्यंत उत्सर्जन कमीत कमी करणारी वाहनं भारतात वाढतील असी सरकारने घोषणा केलीय. इलेक्टि^क आणि फ्लेक्स फ्यgएल इंधनावर चालणार्‍या गाडय़ा वाढवून आपण आपली पर्यावरणीय उद्दिष्टांची गाडी रुळावर ठेवू शकू का हे आता पाहायचंय.

Related Stories

नवा रियलमी ‘सी21 वाय’ फोन दाखल

Patil_p

आर्सेलर मित्तल 2 हजार कोटी गुंतवणार

Patil_p

टेंडाकडून ‘पॉकेट मोबाईल वायफाय’ उपकरण सादर

Patil_p

सॅमसंगचा 110 इंची मायक्रो एलइडी टीव्ही

Patil_p

‘ऍपल’च्या लेटेस्ट फोनची निर्मिती आता भारतात

Patil_p

लवकरच ओप्पोचा फोल्डेबल फोन बाजारात

Patil_p
error: Content is protected !!