ऑनलाईन टीम / तरुण भारत :
तिरुअनंतपुरमधील काँग्रेसचे खासदार शशी थरूर (Shashi Tharoor) मंगळवारी व्हीलचेअरवर बसून संसद भवनात दाखल झाले. त्यानंतर त्यांनी व्हीलचेअरवर बसलेला स्वत:चा फोटो ट्विट करत अपंग लोकांसाठी भारतातील व्यवस्था किती खराब आहे, याबाबत नाराजी व्यक्त केली.
शशी थरूर हे 15 डिसेंबर 2022 रोजी संसद भवनाच्या पायऱ्यांवरुन कोसळले होते. त्यांच्या पायाला दुखापत झाली आहे. त्यामुळे मंगळवारी त्यांनी व्हीलचेअरवर बसून संसद भवन गाठलं आणि सभागृहाच्या कामकाजात सहभाग घेतला.
व्हीलचेअरवरचा फोटो ट्विट करत त्यांनी म्हटले आहे की, “जेव्हा तुम्हाला व्हीलचेअरवर बसून संसदेत प्रवेश करावा लागतो, तेव्हा रॅम्प असलेलं एकच प्रवेशद्वार (गेट क्रमांक 9) असतं. सहाय्यकांच्या मदतीनं लोकसभेत पोहोचण्यासाठी मला चार मिनिटं लागली. या तात्पुरत्या अपंगत्वानं मला शिकवलंय की, भारतातील यंत्रणा अपंग लोकांना किती कमी मदत करते.”
अधिक वाचा : एलॉन मस्क देणार ‘ट्विटर’च्या CEO पदाचा राजीनामा; पण घातली ‘ही’ अट