ऑनलाईन टीम/तरुण भारत
वाढत्या धावपळीमुळे महिलांना अलीकडे आरोग्याशी निगडित अनेक आजारांना सामना करावा लागत आहे. यामध्ये लठ्ठपणा आणि मधुमेहाची (Diabetes) समस्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मधुमेह हा आजार खूप वेगाने वाढतो. यावर कायमस्वरूपी इलाज नाही. मात्र त्याला नियंत्रणात आणण्यासाठी किंवा वाढलेला मधुमेह कंट्रोलमध्ये आणण्यासाठी काही घरगुती उपाय तुम्ही करु शकता. ज्याचा फायदा तुम्हाला मधुमेह कमी करण्यासाठी होवू शकतो. यासाठी आहार, व्यायाम आणि डाक्टरांचा सल्ला या त्रिसूत्रीचा वापर करा.याच बरोबर आहारात काही अशा पदार्थाचा वापर करा ज्यामुळे त्याचा तुम्हाला फायदाच होईल.
ब्रोकोली स्प्राऊट्स
ब्रोकोलीमध्ये सल्फोराफेन नावाचा पदार्थ असतो. जो रक्तातील साखर कमी करण्यास मदत करतो. याचबरोबर यात ग्लुकोराफेनिन सारखे घटक असतात जे वाढलेल्या मधुमेहातील रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करतात. हाय मधुमेह असणाऱ्या रुग्णांसाठी संजिवणी सारख काम करतो. यासाठी आहारात ब्रोकोली स्प्राऊट्सचा वापर करा.
भोपळ्याच्या बिया
फास्टफूडच्या जमान्यात पौष्टिक अन्नपदार्थ आपण खायचे विसरलो आहोत. ग्रामीण भागात सजह उपलब्ध असणारे असे अनेक पदार्थ आहेत ज्याचा फायदा तुम्हाला मधुमेह कमी करण्यासाठी होऊ शकतो. जसे की भोपळ्याच्या बिया. आपण भोपळा फक्त संक्रातीला खातो.आणि जर आवड असेल तरच त्यातील बिया खातो किंवा मग कुठेतरी ठेवून देतो किंवा टाकून देतो. मात्र या बिया मधुमेह कमी करण्यासाठी उपयोगी असतात. यात फायबर आणि अँटिऑक्सिडंटटे प्रमाण भरपूर असल्याने रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी याचा फायदा होतो. भोपळ्याचा रस किंवा त्याची पावडर करुन देखील वापरू शकता.
नट्स
शेंगदाणे आणि बदाम हे दोन्ही खाल्ल्याने जेवणानंतरच्या रक्तातील साखरेची पातळी कमी होण्यास मदत होते. तसेच दररोज 56 ग्रॅम नट खाल्ल्याने रक्तातील साखर कमी होऊ शकते.यासाठी नियमित शेंगदाणे आणि बदाम प्रमाणात खा. कोणतीही गोष्ट अतिप्रमाणात खाल्ली तर त्याचे दुष्परिणाम होवू शकतात.यासाठी खाताना याचे प्रमाण योग्य ठेवा.
चिया सीड्स
चिया सीड्स खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी कमी होते आणि इन्शुलिनची संवेदनशीलता सुधारते.यामुळे रक्तातील साखर नियंत्रित राहते.