Hrithik Sawant Selection for Kick Boxing World Championship Tournament
दिल्ली येथे झालेल्या खुल्या आंतरराष्ट्रीय किक बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत सेमी फायनल पर्यंत मजल मारलेल्या ओवळीये गावचा सुपुत्र ऋतिक सत्यवान सावंत याला दुखापतीमुळे सेमी फायनलमध्ये हार पत्करावी लागली. मात्र या स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीमुळे त्याची इटली येथे होणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियन किक बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
दिल्लीत तळकटोरा इंदोर स्टेडियम येथे झालेल्या दुसऱ्या भारतीय खुल्या आंतरराष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेच्या ५७ किलो वजनी गटातून खेळताना या स्पर्धेच्या सेमी फायनल पर्यंत मजल मारली. मात्र सेमी फायनलच्या पहिल्या दोन फेरीत बरोबरी झाल्यानंतर अंतिम तिसऱ्या फेरीत तीन पैकी दुसऱ्या मिनिटालाच स्नायूच्या दुखापतीमुळे ऋतिकला माघार घ्यावी लागली.
ओटवणे / प्रतिनिधी