तरुणभारत ऑनलाइन टीम
अनेक तरुणांच्या गळ्यातला ताईत बनलेली मराठमोळी अभिनेत्री हृता दुर्गुळे सध्या ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेत दिसत आहे.या मालिकेतील हृताने साकारलेली दिपूची भूमिका अधिक लोकप्रिय झाली आहे.पण सध्या हृता ‘मन उडू उडू झालं’ ही मालिका सोडत असल्याचं सांगितलं जात आहे.
ई टाइम्सच्या वृत्तानुसार काही दिवसांपूर्वी सेटवर अस्वच्छता असल्यामुळे हृता आणि मालिकेच्या निर्मात्यांमध्ये भांडण झालं होतं. या वादानंतर हृताने शोमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असं म्हंटल जात आहे परंतु, मालिकेत काम करण्यापूर्वी हृताने केलेल्या करारानुसार, तिला एक महिन्याचा नोटीस पिरिअड पूर्ण करावा लागणार आहे. त्यानंतरच तिला ही मालिका सोडता येईल.मात्र या बाबत हृताने अद्याप कोणतही स्पष्टीकरण दिलेलं नाही.दरम्यान, हृताने ही मालिका सोडल्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.
‘मन उडू उडू झालं’ मालिकेला हृताने दिला निरोप ?
Advertisements