Tarun Bharat

भारताची वाटचाल महासत्ताच्या दिशेने

प्रतिनिधी,कोल्हापूर
कोरोनात भारताचे जागतिक स्तरावरील योगदान अतिशय महत्वाचे राहिले आहे.जगातील कोणत्याच देशाचा चीनवर विश्वास राहिलेला नाही,अमेरिकेसह इतर देशाची अर्थव्यवस्था कमकुवत होत चालली आहे.अशा परिस्थितीत भारताची वाटचाल मात्र आर्थिक महासत्तेच्या दिशेने सुरू आहे,असे प्रतिपादन पंतप्रधानांचे दक्षिण आफ्रिका,लडाखचे विशेष सल्लागार डॉ.दिपक व्होरा यांनी केले.

डी.वाय.पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग व टेक्नॉलॉजीतर्फे आयोजित ‘व्हिजन-2047’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते.डी.वाय.पाटील शिक्षण संस्थेचे विश्वस्त,आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते डॉ.व्होरा यांचा सत्कार करण्यात आला.हॉटेल सयाजीमधील मेघमल्हार सभागृहातील आयोजित व्याख्यानासाठी प्राध्यापक,विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

अधिक वाचण्यासाठी य़ेथे क्लिक करा- चौदावं वरीस धोक्याचं….

डॉ.व्होरा म्हणाले,पहिले व दुसरे महायुध्द,रशियाचे विघटन यामागील दशकातील महत्वाच्या घटना आहेत.21 व्या शतकात कोरोना व्हायरस चीनने जगभर पसरवल्याने चीनवर कोणताच देश विश्वास ठेवत नाही.सर्व जग एक परिवार असल्याचे मानत भारताने कोरोनामध्ये विदेशातील देशांना कोरोनाची लस पुरवली अन अनेकांचे जीव वाचवले.तर अमेरिकेची आर्थिक ताकद कमी होत चालली आहे.युरोपात गेल्या काही दशकापासून मोठा दुष्काळ पडला आहे.वातावरणातील बदल आणि दहशतवादाचा जगावर मोठा परिणाम होत चालला आहे.सध्या भारताच्या लोकसंख्येच्या तुलनेत युवा वर्गाचे प्रमाण मोठे असून यात युवतींची संख्या जास्त आहे.भारताची सैन्यशक्तीत जगात तिसऱया क्रमांकावर आहे.यामध्ये भारताच्या नेवी सैन्यांबरोबर जगातील कोणताच देश लढू शकणार नाही,लढला तर टिकणार नाही.

भारताने खूप मोठे हायवे उभारले जात आहेत.भारत देश पूर्णपणे डिजीटल होत असून 10 कोटीचा टप्पा पूर्ण केला आहे.तसेच भारताची इकॉनॉमी आणि टेक्नॉलॉजी सिस्टम अतिशय सशक्त बनली आहे.भारताने ‘वासुदेव कुटुंबा’प्रमाणे संपूर्ण जगाला शांती व मदतीचा हात दिला आहे.भारत पृथ्वीला आपली माता मानत असल्याने पर्यावरणाचा ऱहास रोखण्याचा प्रयत्न केला जातो.तसेच नदय़ा,पहाड आणि सहय़ाद्रीसह देशभरातील जैवविविधता जपली जात आहे.त्यामुळेच 2047 मध्ये भारत महासत्ता असणार आहे.डी.वाय.पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक राकेशकुमार मुदगल,कुलगुरू डॉ.के.प्रथापन,कुलसचिव डॉ.व्ही.व्ही. भोसले,अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ.संतोष चेडे,डॉ.एल.व्ही.मालदे, प्राचार्य डॉ.महादेव नरके,उपकुलसचिव संजय जाधव,शिवाजी विद्यापीठ सिनेट सदस्य,औद्योगिक संघटनांचे सदस्य,उद्योजक,प्राध्यापक,विद्यार्थी आदी उपस्थित होते.

Related Stories

कर्ज माफीसाठी आधार प्रमाणीकरण व तक्रार निराकरणाची विशेष मोहिम – जिल्हा उपनिबंधक

Archana Banage

जिवबनाना पार्कसह परिसरातील प्रलंबित मागण्यांसाठी नागरिकांचे आमरण उपोषण

Abhijeet Khandekar

भाजपचा उमेदवार दोन दिवसात होणार जाहीर

Abhijeet Khandekar

बेळगाव निवडणूक : मराठी माणसाचा पराभव नव्हे तर लोकशाहीची हत्या

Archana Banage

मराठा-कुणबी विद्यार्थ्यांचे ‘जंतरमंतर’वर आंदोलन

tarunbharat

मळणी मशीनमध्ये सापडून महिला जागीच ठार,पन्हाळ्यातील मोहरेतील घटना

Archana Banage