Tarun Bharat

भाजपच्या बॅनरवरून अमित शहांचा फोटो गायब..?

Advertisements

ऑनलाईन टीम / मुंबई

एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी बसवून भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वाने अनपेक्षित धक्का दिलाय. या राजकिय घडामोडीत देवेद्र फडणवीसांना डावलल्यामुळे फडणवीस समर्थक नाराज असल्याच्या चर्चा माध्यामात सुरू आहेत. भाजपचे जेष्ठ नेते आणि केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांचा फोटो भाजपच्या बॅनरवरून गायब झाल्याने या चर्चांना उधाण आलं आहे.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार असे भाजप कार्यकर्त्यांसह देवेंद्र फडणवीस समर्थकांनाही वाटत होते. त्याची सर्व माध्यमांमध्येही चर्चाही सुरू होती. पण एनवेळी दिल्लीतून फोन आला आणि आणि देवेंद्र फडणवीस यांच्याऐवजी बंडखोर नेते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील असा आदेश काढण्यात आला. त्यामुळे फडणवीस समर्थकांमध्ये देवेंद्रना डावलल्याची भावना निर्माण झाली आहे असे चित्र सर्वत्र दिसत आहे.

मुंबईमध्ये भाजप कार्यालयामध्ये आनंदाचे वातावरण असताना मात्र स्वत: देवेंद्र फडणवीससह प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांची अनुउपस्थिती उल्लेखनिय होती. भाजप कार्यालयाच्या दारात लावलेल्या बॅनरवर देवेंद्र फडणवीस यांच्यासह महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांचे फोटो असून त्यांचे अभिनंदन केले आहे. पण बॅनरवरून गृहमंत्री अमित शहा यांचा फोटो गायब झाल्याने याची सर्वत्र चर्चा सुरु आहे. त्यामुळे महाराष्ट्र भाजपमध्ये सर्व काही अलबेल तर आहे ना ?असा प्रश्न उपस्थित झालाय.

Related Stories

महाराष्ट्र : मागील 24 तासात 161 पोलिसांना कोरोनाची बाधा

Rohan_P

शाहूपुरीत 2 दुकाने फोडून 12 हजारांची रोकड लांबवली

Patil_p

सर्वोच्च न्यायालयासमोर योगी सरकारची माघार; कावड यात्रा रद्द

Rohan_P

राजद प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देणार जगदानंद सिंह

Amit Kulkarni

…तर आज आपल्याला राममंदिर भूमिपूजनाचा दिवस पाहताच आला नसता : संजय राऊत

Rohan_P

चंद्रकांत पाटील कानमंत्र देणार की खरडपट्टी काढणार?

Patil_p
error: Content is protected !!