प्रतिनिधी / बेळगाव : तालुक्यातील हुचेंनहट्टी आणि पिरणवाडी येथे अवैध्य तांदूळसाठा जप्त करण्यात आला होता. त्या ठिकाणी बेळगाव ग्रामीण पोलिसांनी धाड टाकून 31 टन 350 किलो रेशनाचा तांदूळ जप्त केला आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी वसीम इमान साहब मुजावर राहणार शिक्षक कॉलनी हुचेंनहट्टी व संजय सुबराव भोसले राहणार जांबोटी रोड पिरणवाडी यांना अटक केली आहे.