ठिकठिकाणी दौडचे स्वागत : पहाटेपासूनच शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांचा जयघोष, प्रत्येक खेडय़ामध्ये उत्साहाचे वातावरण
प्रतिनिधी / खानापूर
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्यावतीने शहर व काही खेडय़ात दुर्गामाता दौड काढण्यात येत होती. यावर्षीपासून तालुक्यातील सर्व खेडय़ातून दुर्गामाता दौड सुरू करण्यात यावी, यासाठी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजीराव भिडे गुरुजी यांनी तालुक्यात बैठका घेऊन तरुण कार्यकर्त्यावर जबाबदारी सोपविण्यात आली होती. तसेच नियोजनही करण्यात आले होते. त्यानुसार जबाबदारी घेऊन तरुणांनी तालुक्यातील पूर्व, पश्चिम, दक्षिण व उत्तर अशा चार भागात विभागणी करून त्या त्या भागातील युवकांवर प्रत्येक खेडय़ात दुर्गामाता दौड सुरू करण्याची जबाबदारी देण्यात आली.
यासाठी खानापूर तालुक्यातील धारकरी तसेच बेळगाव येथील 40 धारकऱयांनी सतत संपर्क दौरा केला होता. या प्रयत्नाला यश आले असून तालुक्यातील सर्व गावामध्ये दुर्गामाता दौड सुरू झाली आहे. सोमवारी पहिल्या दिवशी खानापूर येथील अनेक शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते नवीन दौड सुरू करण्यासाठी पहाटेच गावागावात गेले होते. व दौड सुरू करण्यासंदर्भात सूचना व माहिती घेऊन पहिल्या दिवशीची दौड सुरू करून देण्यात आली. या दौडमुळे सद्या खानापूर तालुक्यात वातावरण भक्तिमय बनले असून पहाटेपासूनच शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांचा जयजयकार तसेच गावागावात भगवा पताका, भगवे झेंडे, रांगोळय़ांनी गावाचे रुपच बदलून गेले आहे. प्रत्येक खेडय़ात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दौडमध्ये तरुण, युवा, युवती तसेच ज्येष्ठ नागरिक सहभागी होत आहेत. तर सुहासिनी दौडला आरती करून स्वागत करत आहेत.
दोड्डहोसूर येथे दौडचे उत्साही स्वागत
चापगाव : लोकोळी येथील श्री शिवप्रति÷ान हिंदुस्थानतर्फे ग्रामपंचायत क्षेत्रातील गावात दुर्गादौड काढली जात आहे. बुधवारी दोड्डहोसूर येथे दौड काढण्यात आली. यावेळी दौड्डहोसूर ग्रामस्थांच्यावतीने उत्साही स्वागत करण्यात आले. गावात दुर्गा मातेचा व शिवरायांचा जयघोष करत विविध मार्गांवरून गावात दौड काढण्यात आली.
ग्राम पंचायत माजी सदस्य व उद्योजक प्रकाश पाटील यांनी ध्वज घेऊन गावात विविध मार्गातून दौड काढली. यावेळी गावात सुहासिनींनी रांगोळी टाकून तसेच आरती ओवाळून दौडचे स्वागत केले. यावेळी पंच कमिटीचे अध्यक्ष नारायण पाटील यासह गावातील अनेक ज्ये÷ मंडळी व युवकांनी यामध्ये सहभाग घेतला होता. विठ्ठल-रखुमाई मंदिराजवळ दौडची सांगता झाली.
ओलमणी येथे दौडला तरुणांचा उत्साह
जांबोटी : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान ओलमणी शाखेतर्फे दुर्गामाता दौडला प्रारंभ करण्यात आला. दौडमध्ये युवा-युवती वर्गासह बालचमुंचा मोठय़ा प्रमाणात सहभाग आहे.
गावामध्ये 12 वर्षांपासून दौडचे आयोजन करण्यात येते. घटस्थापनेदिवशी 5.30 वाजता गावातील मारुती मंदिरपासून दौडला प्रारंभ झाला. सोमवारी प्रभाकर साबळे यांच्या हस्ते भगव्या ध्वजाचे पूजन करून दौडला प्रारंभ करण्यात आला. ग्राम पंचायत सदस्य अशोक सुतार यांच्या हस्ते शस्त्रपूजन, जोतिबा जगताप यांच्या हस्ते मशाल प्रज्वलित करून व जवान भैरु नावलकर यांच्या हस्ते त्रिशूल पूजन करून प्रेरणा मंत्राने दौडला प्रारंभ करण्यात आला. या दौडची रोज वेगवेगळय़ा मंदिरामध्ये महाआरती व प्रेरणामंत्राने सांगता करण्यात येते. गावामध्ये ठिकठिकाणी दौडचे स्वागत करण्यात आले. विजयादशमी रोजी या दौडची सांगता होणार आहे.
दौड यशस्वी करण्यासाठी राजू चिखलकर, हणमंत जगताप, पिंटू नावलकर, विलास सुतार, प्रमोद चिखलकर, किरण साबळे, वैभव राऊत, अमर देसाई, देवाप्पा कित्तूरकर, राजू जगताप, श्रीनाथ खाडे, चंद्रकांत बैलूरकर, वैभव राऊत, प्रल्हाद चिखलकर, अमर राऊत, राजू साबळे, नामदेव सुतार व शिवप्रेमी परिश्रम घेत आहेत.