वार्ताहर / सांबरा
सार्वजनिक शिक्षण खात्यातर्फे नुकत्याच घेण्यात आलेल्या हलगा विभागीय क्रीडा स्पर्धेत बाळेकुंद्री खुर्द येथील जनता शिक्षण संस्था (सांबरा) संचालित जनता विद्यालयाच्या विद्याथ्यानी घवघवीत यश संपादन केले.
अडथळा शर्यतीत देवसय्यम बुदाल-प्रथम, मंगल नायक-द्वितीय व चैत्रा सोपीमठ तृतीय, 1500 मी. धावणे कार्तिक हिरेमठ तृतीय, हॅमर थ्रो साक्षी नायक तृतीय, लांब उडी चैत्रा सोपीमठ द्वितीय, 4द्ध100 मी. रिले कुशाल कुंभार, महेश होळेणावर, विशाल चौगुले व देवसय्यम बुदाल यांनी द्वितीय क्रमांक, 400 मी. धावणेत संजना दरेपगोळ प्रथम क्रमांक.
पोहणे- मुली नम्रता देसाई (फ्रीस्टाईल), सुप्रिया पगडी (फ्रीस्टाईल), ज्योती बैलण्णावर (बटरफ्लाय) व बॅकस्ट्रोकमध्ये भाग्यश्री हळेमनी हिने प्रथम क्रमांक, पोहणे- मुले विशाल चौगुलेने बटरफ्लाय व बॅकस्ट्रोकमध्ये प्रथम, धीरज कोलकार (फ्रीस्टाईल), नागराज सोमापूर (बटरफ्लाय) व सुमित कोळेकर याने बेस्ट स्ट्रोकमध्ये प्रथम क्रमांक मिळविला. क्रिकेट- प्रज्वल मास्तमर्डी, अंकित रामचनावर, भरत कोलकार यांनी प्रथम क्रमांक, योगा- विश्वनाथ तानशी व काव्या करोली यांनी प्रथम क्रमांक, कुस्ती- भरत कोलकार प्रथम तर हर्षद अष्टेकर याने द्वितीय क्रमांक, कराटे-जुडोमध्ये राधिका मल्लवगोळ प्रथम क्रमांक. सर्व विद्यार्थ्यांना क्रीडाशिक्षिका जयश्री देसाई, मुख्याध्यापक एस. एस. गडदवर व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.