Tarun Bharat

हुमाचा नवा लुक पाहून चाहते पडले गोंधळात

Advertisements

तरुणभारत ऑनलाइन टीम


सध्या बॉलीवूड मध्ये अनेक बायोपिक बनत आहेत. आलियाच्या गंगुबाई काठियावाडी या चित्रपटानंतर आत्ता हुमा कुरेशी तिच्या पहिल्या बायोपिकमध्ये काम करण्यासाठी सज्ज झाली आहे.हुमाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर चित्रपटाचे पहिले पोस्टर शेअर केले आहे.प्रसिद्ध भारतीय खाद्य लेखक तरला दलाल यांची भूमिका हुमा साकारणार आहे.

हुमाने शेअर केलेल्या पोस्टर मध्ये तिने मोठा चष्मा ,टिकली लाल साडी परिधान केली असून गोंडस स्माईल दिली आहे. हे पोस्टर सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच या पोस्टवर हुमाच्या चाहत्यांनी कमेंट चा वर्षाव केला आहे.तिच्या लुकबद्दल अभिनेत्रीचे कौतुक केले. तसेच तिला शुभेच्छाही दिल्या आहेत.तर तिच्या एका चाहत्याने मी आता खूप गोंधळलो आहे, “तू ओळखता येत नाहीस”अशी कमेंट केली आहे. हुमा तरला दलाल यांची मसालेदार कहाणी घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.तरला दलाल ह्या एक खाद्य लेखक, आचारी, कुकबुक लेखक आणि कुकिंग शोचे होस्ट होत्या. त्यांनी भारतीय आणि विशेषतः गुजराती पाककृतींमध्ये विशेष प्राविण्य मिळवले.त्यांच्या या बायोपिकचे दिग्दर्शन पियुष गुप्ता करणार आहेत.

Related Stories

अवधूतच्या मित्रांसाठी तो ‘गुप्ते वहिनी’

Patil_p

अभिनेता अर्जुन रामपालच्या बहिणीला एनसीबीकडून समन्स

Rohan_P

कारगिल हिरोवरील जीवनपटाचा मुहूर्त ठरला

Patil_p

सगळं कसं खरंखुरं!

tarunbharat

12 व्या मजल्यावरून कोसळली, चालकाच्या हातात विसावली

Amit Kulkarni

टॉमशी विवाह केल्याने कारकीर्द बुडाली

Patil_p
error: Content is protected !!