सीपीएड मैदानावर कार्यक्रमाचे आयोजन : राहुल गांधींची उपस्थिती राहणार
बेळगाव : सीपीएड मैदानावर उद्या होणाऱया प्रजाध्वनी कार्यक्रमाला काँग्रेस नेते राहुल गांधी उपस्थित राहणार आहेत. त्या करिता अलतगा येथे पूर्वबैठक घेतली. बैठकाया अध्यक्षस्थानी देवस्थान पंच कमिटी चेअरमन चंद्रकांत धुडूम होते. प्रमुख उपस्थिती म्हणून कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे सदस्य मलगौडा पाटील उपस्थित होते. ग्राम पंचायत सदस्य चेतक कांबळे प्रास्ताविकात म्हणाले, येत्या 25 एप्रिल रोजी होणाऱया महालक्ष्मी यात्रेला सर्वतोपरी सहकार्य यमकणमर्डीचे आमदार सतीश जारकीहोळी यांनी केले आहे. ग्राम पंचायतीच्या माजी अध्यक्षा लता पाटील यांनी रोजगार महिलांच्यावतीने प्रजाध्वनी यात्रेस पाठिंबा व्यक्त केला. लक्ष्मी यात्रा कमिटीचे मार्गदर्शक अशोक घुग्रेटकर यांनी गावामध्ये होणाऱया सोयीसुविधांचा आढावा घेऊन जारकीहोळी यांनी केलेल्या कामांचे वाचन केले. देवस्थान पंच कमिटो माजी सदस्य पितांबर पाटील यांनीही वार मांडले. यावेळी तुकाराम चौगुले, वैजू चौगुले, शैलेश पवार, संजय अलोजी, शिवाजी पावशे, लक्ष्मादेवी यात्रा कमिटी अध्यक्ष सोमनाथ अलोजी, अनिल पावशे, पिराजी पावशे, गणपत सुतार, सेक्रेटरी पिंटू चौगुले, सिद्राय दळवी, खजिनदार हणमंत कंग्राळकर, तुकाराम चौगुले, यल्लापा कांबळे, कृष्णा चौगुले व रोजगार हमी योजनेच्या सर्व कार्यकर्त्यां उपस्थित होत्या