Tarun Bharat

मोहिमेमध्ये शेकडोंच्या संख्येने धारकरी सहभागी होणार

प्रतिनिधी /बेळगाव

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या नेतृत्वाखाली व भिडे गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली शनिवार दि. 14 ते मंगळवार दि. 17 मे दरम्यान मोहीम होणार आहे. आतापर्यंत शेकडो धारकऱयांनी शिवप्रतिष्ठानकडे नावनोंदणी केली असून, उर्वरित धारकऱयांनी 13 मेपूर्वी नावनोंदणी केलेले पत्र व शुल्क जिल्हाप्रमुखांकडे जमा करावयाचे आहे. यावषीच्या मोहिमेमध्ये मोठय़ा संख्येने धारकरी सहभागी होतील असा विश्वास जिल्हाप्रमुख किरण गावडे यांनी व्यक्त केला.

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बेळगाव विभागाची महत्त्वपूर्ण बैठक सोमवारी अनसूरकर गल्ली येथील छत्रे वाडय़ात पार पडली. या बैठकीत मोहिमेविषयी चर्चा करण्यात आली. मागील दोन वर्षात मोहीम झाली नसल्याने शिवभक्तांचा हिरमोड झाला होता. त्यामुळे यावषी विशाळगड ते पन्हाळगड अशी मोहीम काढली जाणार आहे. प्रत्येक मोहिमेमध्ये बेळगाव विभागाचा सहभाग सर्वाधिक असतो. यावेळीही मोठय़ा संख्येने धारकरी सहभागी होणार असल्याने आतापासूनच तयारी करण्यात आली असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.

चित्ररथ मिरवणुकीतील प्रकाराने नाराजी

बेळगावमधील शिवजन्मोत्सव हा देशात प्रसिद्ध आहे. येथे काढण्यात येत असलेले सजीव देखावे पाहण्यासाठी परिसरातून हजारो शिवभक्त येतात. परंतु यावषी राजकीय हस्तक्षेपामुळे मिरवणुकीत विस्कळीतपणा जाणवला. दुरून आलेल्या शिवभक्तांनी चित्ररथ न पाहताच माघारी फिरणे पसंत केले. एकाच ठिकाणी झालेली गर्दी, डीजेमुळे एकाच जागी राहिलेले देखावे असे प्रकार यापुढे घडू नयेत यासाठी प्रत्येक शिवभक्ताने बदल घडविणे गरजेचे आहे.

प्रत्येक धारकरी आपापल्या विभागातील चित्ररथांवर पुढील वषी कार्यरत राहतील, असे किरण गावडे यांनी सांगितले.

यावेळी शिवप्रतिष्ठानचे पदाधिकारी यांच्यासह विश्वनाथ पाटील, अजित जाधव, कल्लाप्पा पाटील, पुंडलिक चव्हाण, किरण बडवाण्णाचे, अनंत चौगुले, गजानन पवार, नामदेव पिसे, तुकाराम पिसे, महेश जांगळे, तुकाराम पाटील, अशोक पाटील, स्वप्नील वाघवडेकर, जोतिबा चोपडे, जोतिबा टक्केकर, नागेंद्र कुंडेकर, आकाश कुकडोलकर, किरण पाटील, हिरामणी मुचंडीकर, प्रवीण मुरारी, प्रमोद मुतगेकर, परशराम पाटील, चंद्रकांत चौगुले व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

Related Stories

जितो लेडिज विंगतर्फे ‘पहचान’ वेबिनार

Amit Kulkarni

कर्नाटक: राज्यात चोवीस तासात अडीच हजार रुग्णाची भर

Archana Banage

बेळगावच्या विमानसेवेला घरघर

Amit Kulkarni

फसव्या एजन्सींपासून सावध रहा!

Amit Kulkarni

ग्राम वास्तव्यात जाणून घेतल्या नागरिकांच्या तक्रारी

Amit Kulkarni

शहरात आज टाळ-मृदंगांचा गजर

Omkar B