Tarun Bharat

हंगेरीचा जर्मनीवर निसटता विजय

Advertisements

वृत्तसंस्था/ बर्लिन

नेशन्स लीग आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत हंगेरीने यजमान जर्मनीचा 1-0 अशा गोलफरकाने निसटता पराभव करत आपली शेवटच्या चार संघात प्रवेश मिळविण्याच्या दिशेने वाटचाल केली. हंगेरीचा अद्याप एक सामना बाकी आहे.

नेशन्स लीग फुटबॉल स्पर्धेतील अ गटातील हंगेरीचा आता तिसरा सामना सोमवारी इटलीविरुद्ध होणार आहे. हंगेरीचा कर्णधार 34 वर्षीय ऍडॅम झेलाईचा हा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना राहिला. या सामन्यानंतर झेलाई आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्त झाला. या स्पर्धेतील जर्मनीविरुद्ध झालेल्या सामन्यात कर्णधार झेलाईने 17 व्या मिनिटाला जर्मनीचा गोलरक्षक स्टिगेनला हुलकावणी देत एकमेव निर्णायक गोल नोंदविला. हंगेरीने यापूर्वी या स्पर्धेतील जूनमध्ये झालेल्या सामन्यात इंग्लंडचा 4-0 असा पराभव केला होता. या स्पर्धेच्या गुणतक्त्यात हंगेरीचा संघ अ गटातून 10 गुणासह पहिल्या स्थानावर असून इटली 8 गुणासह दुसऱया तर जर्मनी 6 गुणासह तिसऱया स्थानावर आहे. इटलीने यापूर्वी झालेल्या सामन्यात इंग्लंडचा 1-0 असा पराभव करून आपल्या गटात दुसरे स्थान मिळविले आहे. इंग्लंडचा संघ केवळ दोन गुणासह शेवटच्या स्थानावर आहे.

Related Stories

माजी स्पिनर चंद्रशेखर इस्पितळात

Patil_p

भारत-जपान आज चुरशीची हॉकी उपांत्य लढत

Patil_p

वर्ल्ड हॉकी फाईव्ज स्पर्धा लांबणीवर

Patil_p

नीक पॉप न्यू कॅसलशी करारबद्ध

Patil_p

आयसीसी क्रिकेट समिती अध्यक्षपदी सौरभ गांगुली

Patil_p

गुणवंत खेळाडूंना केंद्रीय नोकरीची लॉटरी

Patil_p
error: Content is protected !!