वनअधिकाऱ्यांच्या कारवाईत जवानाच्या धरी सापडले प्राण्य़ांचे अवयव
सातारा : गोपनीय माहितीच्या आधारे वनअधिकाऱ्य़ांनी माची पेठ येधील एका सदनिकेत टाकलेल्या धाडीत सैन्यातील जवान युवराज निमन यांच्या राहत्या घरात भेकर, व चौसिंगा या दोन वन्यजीव प्राणी यांचे मुंडके व भेकराचे ताजे मटण व पायाचे खुर सापडले असून या घटनेने शहरात खळबळ माजली आहे.
अधिक चौकशी युवराज निमन याच्याकडे केले असता त्याने सदर शिकार ही ठोसेघर येथील नारायण सिताराम बेडेकर, विठ्ठल किसन बेडेकर, व स्वता मिळून शिकार केली असल्याचे कबूल केले. नारायण यांच्याकडे असलेल्या सिंगल बोअर बंदुकीने आज सकाळी साधारण 7.30 वाजता भेकर याची शिकार बंदुकीने केली, व भेकर चेटकीच्या ओढ्यात सोलून त्याचा मटणाचे वाटे केले, त्या पैकी आज सकाळी एका भेकराचे मुंडके व थोडे मटण हे युवराज निमन याला दिले. कातडे सोलून ओढ्यात लपविले, व उरलेले मटण पैकी थोडे मटणाचा वाटा विठ्ठल बेडेकर याला दिला तर उर्वरित सर्व मटण हे नारायण यांनी स्वतःच्या घरी घेऊन आले.
नारायण ह्यांनी सर्व मटण स्वतःच्या घरात एका पिशवीत घालून सदर पिशवी घरामागील खोलीत शेणीच्या खाली लपवून ठेवले होते. सदर मटण हे सातारा मध्ये कोणा बड्याहस्तीला देण्यासाठी लपवून ठेवले होते, व ते मटण हे रात्री घेऊन जाणार होता असे नारायण यांनी सांगितले. सदर तीन आरोपीना वनविभागाने शिताफीने सातारा व ठोसेघर येथे अटक करण्यात आले.
सर्व मुद्देमाल दोन बंदूका एक एअर गन व एक सिंगल बोअर बंदूक व जिवंत काडतुसे, भेकर सोलल्याचे चाकू , कोयता व वेगवेगळ्या ठिकाणी लपविले मटण व कातडे हे सर्व घटनास्थळी दाखविले, सर्व गोष्टी वनविभागाने पंचा समोर जप्त केल्या. आरोपीना अटक करण्यात आले असून वन गुन्हा नोंद झाला आहे. शिकारी हे सराईत शिकारी आहेत त्यांनी ह्या पूर्वी अशे वेगवेगळे गुन्हे केलेले आहेत.त्याचे पुरावे वनविभागास मिळाले आहेत. पुढील चौकशी सहायक वनसंरक्षक सुधीर सोनवले हे करीत आहेत.