Tarun Bharat

राज्यात पहिल्यांदाच तृतीयपंथी नगरसेवक; चंदेरीनगरीत तातोबा हांडेंना मान

हुपरी,प्रतिनीधी

Kolhapur Political: हुपरी (ता. हातकणंगले) येथे कोल्हापूर जिल्हा ताराराणी विकास आघाडीचे खंबीर नेतृत्व असलेले तातोबा बाबुराव हांडे या तृतीयपंथीची नगरपरिषदेच्या स्वीकृत नगरसेवक पदासाठी बिनविरोध निवड करण्यात आली.  महाराष्ट्रात तृतीयपंथीला चंदेरीनगरी हुपरीने प्रथम मान देऊन सेवा करण्याची संधी दिली आहे. त्यावेळी आघाडीच्या कार्यकर्त्यांनी व हांडे समर्थकांनी गुलालाची उधळण करीत फटाक्यांची आताशबाजी करत भव्य मिरवणूक काढली.

हुपरी नगरपरिषदेत भारतीय जनता पार्टीची सत्ता असून त्यांना कोल्हापूर जिल्हा ताराराणी विकास आघाडीच्या नगरसेवकांनी बिनशर्त पाठींबा दिला आहे.ताराराणी विकास आघाडीचे स्वीकृत नगरसेवक प्रकाश बावचे यांनी आपल्या पदाची मुदत संपल्यानंतर राजीनामा दिला होता. त्यामुळे स्वीकृत नगरसेवक पद रिक्त झाले होते. त्या रिक्त झालेल्या स्वीकृत नगरसेवक पदाची निवड करण्यासाठी नगरपरिषदेच्या वतीने विशेष सर्वसाधारण सभा बोलाविण्यात आली होती. त्या सभेच्या अध्यक्ष प्रथम नगराध्यक्षा जयश्री महावीर गाट ह्या होत्या. स्वीकृत नगरसेवक पदासाठी इतर कोणाचाही अर्ज नसल्याने तातोबा बाबुराव हांडे या तृतीयपंथी आईस नियमांचे उल्लंघन न करता एकमेव अर्ज असल्याने स्वीकृत नगरसेवक पदी निवड झाल्याची घोषणा करण्यात आली.

कोल्हापूर जिल्हा ताराराणी विकास आघाडीचे स्वीकृत नगरसेवक पद रिक्त झाले होते. या पदासाठी आमदार प्रकाश आवाडे, जिल्हा परिषद सदस्य डॉ .राहुल आवाडे ,साखर कारखान्याचे संचालक सुरज बेडगे यांनी हुपरी आणि परिसरात  देव आई म्हणून नावारूपाला आलेल्या तृतीयपंथी तातोबा बाबूराव हांडे यांच्या कामाची व लोकांना हाताळण्याची पद्धत बघून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याने बिनविरोध निवड करण्यात आली.

हेही वाचा- तरुण भारतचे वृत्त ठरले खरे; चंदगडातील शिवसेना शिंदे गटात सामील

तातोबा हांडे यांनी २०१७ मध्ये कोल्हापूर जिल्हा ताराराणी विकास आघाडीच्या वतीने निवडणूक लढविण्यासाठी फाॅर्म भरला होता. त्यावेळी भाजपच्या उमेदवाराने हरकत नोंदवून छाननीत अर्ज बाद केला होता. त्याचा वजावटा म्हणून त्यांना आज स्वीकृत नगरसेवक केले आहे.

विशेष सर्वसाधारण सभेस अधिकारी जनबा कांबळे,  उपनगराध्यक्षा सुप्रिया पालकर, सभापती अनिता शशिकांत मधाळे, शितल कांबळे, रफिक मुल्ला, सुरज बेडगे, दौलतराव पाटील, बाळासाहेब मुधाळे, प्रकाश जाधव, उदय पाटील, संदीप वाईंगडे, सपना नलवडे, रेवती पाटील, ऋतुजा गोंधळी, गणेश वाईंगडे, अमेय जाधव यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Stories

बार्शीतच कोरोना प्रयोग शाळेस परवानगी द्या – आमदार राऊत

Archana Banage

धोका वाढला : महाराष्ट्रात मागील 24 तासात 67,013 नवे रुग्ण; 568 मृत्यू

Tousif Mujawar

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर ईडीचा छापा

datta jadhav

नागठाणेत शौचालयातील मैला थेट ओढ्यात, कारवाईची मागणी

Archana Banage

कोल्हापूर चंदगड कॉन्झर्वेशन रिझर्व्ह झोनमध्ये वाघाने ‘या’ ठिकाणी केली शिकार

Abhijeet Khandekar

सोलापूर : विजय वडट्टीवार यांच्या पोस्टरला जोडे मारत मराठा समाजाचे आंदोलन

Archana Banage