Tarun Bharat

फ्लोरिडात इयान वादळामुळे नुकसान : 2 जणांचा मृत्यू

Advertisements

वृत्तसंस्था /फोर्ट मायर्स

अमेरिकेच्या फ्लोरिडा प्रांतात  इयान वादळाने मोठे नुकसान घडवून आणले आहे. वादळामुळे फोर्ट मायर्स शहर सर्वाधिक प्रभावित असून तेथे 250 किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने वारे वाहत असून जोरदार पाऊस पडत आहे. धोका पाहता 8.5 लाख घरांमधील वीजपुरवठा रोखण्यात आला आहे. तर वादळामुळे सुमारे 20 लाख लोक प्रभावित झाले आहेत. वादळामुळे रस्त्यांवर शार्कही दिसून आला असून याचा व्हिडिओही समोर आला आहे. स्टॉक आयलँडनजीक तीव्र लाटांमुळे एक नौका बुडाली असून यात 23 जण बेपत्ता झाले आहेत. या नौकेत क्यूबाचे नागरिक प्रवास करत होते. अमेरिकेचे तटरक्षक दल या लोकांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहे.

Related Stories

हातपाय नसतानाही करते सर्फिंग

Patil_p

हिमाच्छादित प्रदेशात खुल्या जागेत प्रदर्शन

Patil_p

जगभरातील कोरोनाबळींची संख्या 6 लाखाच्या उंबरठ्यावर

datta jadhav

सुरक्षा परिषदेत भारत पुन्हा अनुपस्थित

Patil_p

जगभरात कोरोनाने घेतले 27 लाख बळी

datta jadhav

अमेरिका एच-1 बी व्हिसा क्षेत्रात करणार 15 कोटी डॉलरची गुंतवणूक

datta jadhav
error: Content is protected !!