Tarun Bharat

Kolhapur Crime :आत्महत्येचा बनाव करत पत्नीनेच केला पतीचा घात

Advertisements

म्हासुर्ली (कोल्हापूर) : धामणी खोऱ्यातील कोनोली पैकी पानारवाडी (ता.राधानगरी) येथे पती सतत दारू पिऊन घरी येऊन त्रास देत असल्याच्या कारणावरुन पत्नीने दोरीच्या सहाय्याने गळा आवळून पतीचा खुन केला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. गणपती आनंदा कानडे (वय-३९ ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून, संशयित आरोपी पत्नी गीता कानडे (वय -३०) हिला राधानगरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी संध्याकाळी मृताची पत्नी गीता हिने पती गणपती याने तुळईला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे पोलिसाना सांगितले होते. मात्र पोलिसांनी अधिक चौकशी केली असता तिने खून केल्याचे कबूल केले आहे. यानंतर पोलिसांनी गीता कानडे हिला ताब्यात घेतले.

नेमके काय घडले

गुरुवारी पती पत्नीत दारू पिण्याच्या कारणावरून वाद झाला होता. पत्नी गीताने याचा राग मनात धरुन घरातील जेवण खोलीत दोरीने पती गणपतीचा गळा आवळून मारल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी घटनास्थळी गुन्ह्याह्यासाठी वापरलेल्या वस्तू ही जप्त केल्या आहेत. दरम्यान घटनास्थळी पोलिस उपाध्यक्ष साळुंखे यांनी भेट देऊन पाहणी केली. तर पोलिस निरीक्षक नजीर खान यांनी फिर्याद दिली. राधानगरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आप्पासाहेब कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक घाडगे,अनुराधा पाटील, पो.कॉ. बजरंग पाटील यांनी घटनास्थळी भेटी देऊन खुन प्रकरण उघडकीस आणले असून अधिक तपास राधानगरी पोलिस करत आहेत.

Related Stories

एफआरपीच्या तुकड्यांवर शेतकऱ्यांच्या बनावट सह्या – राजू शेट्टी

Abhijeet Shinde

दुचाकीसाठी सरकारची नवी नियमावली

datta jadhav

कोल्हापूर : महापौर निलोफर आजरेकरांना मुदतवाढ

Abhijeet Shinde

कोल्हापूरमध्ये जम्बो कोविड सेंटर उभे करावे

Abhijeet Shinde

‘त्या’ हॉटेल मालकावर कारवाई करा

Abhijeet Shinde

शिवाजी विद्यापीठाच्या नॅक मूल्यांकनास प्रारंभ

Abhijeet Shinde
error: Content is protected !!