लडाख येथे शुक्रवारी झालेल्या भीषण अपघातात हुतात्मा झालेले गडहिंग्लज ( जि. कोल्हापूर ) तालुक्यातील बसर्गे येथील जवान नायक प्रशांत शिवाजी जाधव यांचे पार्थिव रविवारी सकाळी बेळगाव विमानतळावर दाखल झाले. पालकमंत्री गोविंद कारजोळ, आ. अनिल बेनके आणि जिल्हा प्रशासनातर्फे मानवंदना देण्यात आली. बसर्गे येथे लष्करी इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
यावेळी आमदार अनिल बेनके, डी. सी. पी रविंद्र गडादी प्रांताधिकारी रविंद्र करलिंगण्णावर यासह इतर अधिकारी उपिस्थित होते.