प्रतिनिधी/ बेळगाव
एम. वाय. गंगूर फौंडेशन व इंजिनिअर्स कॉम्प्युटर अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने संमोहन या विषयावर एकदिवशीय कार्यशाळा गुजरात भवन येथे पार पडली. आंतरराष्ट्रीय रेकी ग्रॅन्डमास्टर व संमोहन तज्ञ रमेश गंगूर यांनी कार्यशाळेला मार्गदर्शन केले.
प्रारंभी रमेश लद्दड, दीपक धडोती, डॉ. सतीश पाटील, संजीव पर्वतीकर, सुधाकर महेंद्रकर, मिलिंद कुलकर्णी यांच्या हस्ते अग्निहोत्र करण्यात आले. त्यानंतर रमेश गंगूर यांनी संमोहन म्हणजे काय? याबद्दल माहिती देऊन सकारात्मक व नकारत्मक ऊर्जा म्हणजे काय? सांगून सर्वांना संमोहनाद्वारे एका अलौकिक जगात नेले. सुमारे 90 हून अधिक साधकांनी कार्यशाळेचा लाभ घेतला. सूत्रसंचालन निमाई पाटील यांनी केले. सतीश पाटील यांनी आभार मानले.