20 पेक्षा अधिकची सुरक्षित वैशिष्टय़े मिळणार
नवी दिल्ली
हय़ुंडाई इंडियाने भारतीय बाजारपेठेत ग्रँड आय10 एनआयओएसची फेसलिफ्ट आवृत्ती सादर केली आहे. या गाडीची सुरुवातीची किंमत ही 5,68,500 रुपये राहणार असून टॉप प्रकारामधील गाडीची किंमत 8,46,500 रुपयांपर्यंत जाणार असल्याची माहिती आहे.
यावेळी कंपनीने दावा केला आहे, की ग्रँड आय10 ही हॅचबॅक सेगमेंटमध्ये असून याला सहा एअरबॅग्ज असणार आहेत. जी अशाप्रकारे सर्वाधिक एअरबॅग्ज देणारी ही पहिली कार राहणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. हय़ुंडाई कारमध्ये 10 पेक्षा जास्त सुरक्षा वैशिष्टय़े आहेत. बेस व्हेरिएंटला 4 एअर बॅग्ज मिळणार आहेत.
अन्य फिचर्सही मिळणार ः
wक्रूझ कंट्रोल, एलईडी टेललॅम्प, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम
wईएससी, हिल स्टार्ट असिस्ट कंट्रोल व अन्य फिचर्स मिळणार आहे.
wहॅचबॅकचे अगोदरच देशातील सर्व डीलरशिपवर प्री बुकिंगसाठी उपलब्ध होणार आहे.
wग्राहकांना 11,000 रुपयांच्या टोकन रकमेवर हय़ुंडाई डीलरशिपवर कारचे प्री बुकिंग करता
येणार आहे.
2022मधील विक्रीचा आकडा ः
हय़ुंडाई इंडियाने डिसेंबर 2022 मध्ये 38,831 युनिट्सची विक्री केली असून ज्याने वार्षिक 20.2 टक्के इतकी वाढ नोंदवली आहे.