वृत्तसंस्था /नवी दिल्ली
हय़ुंडाई मोटर इंडिया लिमिटेड यांनी आपली नवी टुस्कॉन ही सुव्ह प्रकारातील गाडी नुकतीच लाँच केली आहे. आधुनिक तंत्रज्ञान अवलंबलेली ही कार अनेक वैशिष्टय़ांनी भरलेली आहे.
याप्रसंगी बोलताना कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व सीईओ उन्सू कीम म्हणाले की, चवथ्या पिढीसाठी टुस्कॉनची नवी लक्झरी गाडी सादर करताना अत्यंत आनंद होत आहे. ग्राहकांना ही गाडी आगामी काळात नक्कीच पसंत पडेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला असून या गाडीमध्ये विविध वैशिष्टय़ांचा समावेश केला गेला असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
भारतामध्ये वर्षाला 5 हजार गाडय़ा विक्री करण्याचे ध्येय ठेवले असून सध्याला या गाडीच्या बुकिंगनंतर आठ ते दहा महिने ग्राहकांना थांबावे लागत आहे. 120 शहरांमध्ये 246 ऑटलेटमध्ये सदरची गाडी विक्रीकरिता उपलब्ध करण्यात आली आहे. सदरच्या गाडीची एक्स शो रुम किंमत 27 लाख 69 हजार रुपयांच्या पुढे असणार आहे.
वैशिष्टय़े
- आठ स्पिकर सिस्टीम
- इलेक्ट्रीक पार्किंग ब्रेक
- वायरलेस फोन चार्जर
- रेन सेन्सिंग वायपर्स
- 6 एअरबॅग्ज
- प्रंट आणि रियर पार्किंग सेन्सर्स
- ऑल डिस्क ब्रेक्स