Tarun Bharat

हय़ुंडाई टुस्कॉन 13 जुलैला होणार लाँच

अनेक सुविधांचा समावेश : 25 लाखापर्यंत राहणार किंमत

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

Advertisements

एसयुव्ही गटातील टुस्कॉन ही चारचाकी मोटार हय़ुंडाई पुढील महिन्यात 13 तारखेला बाजारात लाँच करणार आहे. प्रत्यक्षात ही गाडी विक्रीकरिता ऑगस्टमध्ये उपलब्ध केली जाणार असल्याचेही कंपनीने म्हटले आहे.

टुस्कॉन ही गाडी याआधी 2020 मध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये जागतिक स्तरावर दाखल करण्यात आली होती. यानंतर आता ही गाडी सुधारीत स्वरुपात सादर केली जाणार आहे. स्पोर्टस् युटिलिटी गटातील ही गाडी येणाऱया काळात सिट्रोजेन, जीप कंपास यासारख्या मोटारींना टक्कर देणार आहे. सदरच्या गाडीची किंमत ही 25 लाख रुपयांच्या घरात राहण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

या सुविधा असतील

या गाडीमध्ये ऑल एलईडी हेडलॅम्प्सची सुविधा असणार असून पॅरामिट्रीक ग्रिलसह फॉग लॅम्प्सची सोयही असेल. याशिवाय इतरही वैशिष्टय़े या गाडीमध्ये पहायला मिळणार आहेत. सदरची मोटार ही पेट्रोल इंजिनसोबत दाखल होणार असून 6 स्पीड ऑटोमॅटीक ट्रान्स्मिशन यामध्ये असेल, असेही सांगितले जात आहे.

Related Stories

महिंद्राची नवी ‘थार’ बाजारात

Patil_p

रॉयल इनफिल्डची ‘मीटीओर’ लवकरच

Patil_p

ऑडीची क्यू 7 फेसलिफ्ट लाँच

Amit Kulkarni

जीप मेरिडीयनचे बुकिंग 3 मेपासून

Patil_p

नवी सेलेरियो लवकरच बाजारात ?

Patil_p

‘ओला’ 2 हजार 400 कोटी रुपये गुंतवणार

Patil_p
error: Content is protected !!