hasanmushrif-आगामी लोकसभा निवडणुकीला अजून वेळ आहे. मी लोकसभेला इच्छुक नसून मला पुन्हा आमदार व्हायचं आहे. जर खासदार मंडलिक (mp sanjay mandlik) यांचे प्रेम पुन्हा ठाकरे यांच्यावर उफाळून आले तर ते परत येतील. पण पक्ष जे सांगेल ते आम्ही करू, असे मुश्रीफ (hasanmushrif) म्हणाले. खासदार मंडलिक यांचे मन वळवण्यात अपयश आले, या प्रश्नावर मुश्रीफांनी चिमटा काढला. खासदार मंडलिक यांचे मन वळवण्यास सतेज पाटलांना अपयश आले,मला नाही. पण २०२४ ची लोकसभा अजून दूर आहे. पुलाखालून पाणी बरेच वाहून जाणार आहे. त्यामुळे पुढे जे होईल ते बघता येईल. अशी प्रतिक्रिया माजी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. ते कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते.
ओबीसी आरक्षणावरून बोलताना, आम्ही जेवण तयार करून ठेवले, फक्त वाढण्याचे काम शिंदे व भाजप सरकाने केले. हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील मान्य केले. बाँठिया आयोगाचा अहवाल आम्ही नेमला. तो आम्ही सादर केला. पण सत्तेत येऊन चारपाच दिवस झाले असताना भाजप त्याचे श्रेय कसे घेऊ शकतो. असा सवाल माजी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे. राज्यातील चार पाच जिल्ह्यामध्ये ओबीसींना आरक्षण कमी मिळणार आहे. त्यामुळे याचे फेरसर्वेक्षण करणे गरजेचे आहे. असे मुश्रीफ यांनी सांगत मराठा आरक्षणासाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेस आग्रही राहील असे म्हणाले.
बजेटच्या कामांना स्थगिती देण्यात आली आहे. हे दोघांचे सरकार आहे. आमचं सरकार जाणार म्हणून जे घाई घडबडीने निर्णय घेतलेले आहेत. ते रद्द झाले असते तर चालले असते. पण विकासकामे देखील रद्द केलेत, अशी प्रतिक्रिया मुश्रीफ यांनी दिली.
आणखी एकदा आमदार होण्याची इच्छा
माजी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ हे लोकसभेचे उमेदवार असतील, अशी चर्चा जोर धरू लागली आहे. त्यावर बोलताना मुश्रीफ यांनी स्पष्टीकरण दिले आहे. मुश्रीफ म्हणाले. मी लोकसभेला इच्छुक नाही. पण पुन्हा एकदा आमदार होण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावरून मुश्रीफ नेमकी लोकसभा लढवणार कि आणखी काय भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे आहे.