अंकिता लोखंडेला मिळेना काम
टीव्ही सीरियल ‘पवित्र रिश्ता’ फेम अंकिता लोखंडेने अलिकडेच कंगना रनौतसोबत ‘मणिकर्णिका’ या चित्रपटात काम केले होते. त्यानंतर अंकिताला कुठल्याच चित्रपटाची ऑफर मिळालेली नाही. अनेक वर्षे या क्षेत्रात राहून देखील कुणीच मला कामाची ऑफर दिलेली नाही. स्वतःहून कुणाकडे जात काम मागणाऱयांपैकी मी नाही. याचमुळे मला ज्या प्रोजेक्टच्या ऑफर मिळतील, केवळ त्यामध्येच काम करणाऱया निर्णय मी घेतला असल्याचे अंकिताने एका मुलाखतीत सांगितले आहे.


माझा कुणीच गॉडफादर नाही, याचमुळे मी अशा स्थितीत सापडले आहे. मणिकर्णिका चित्रपटानंतर मला कुठलीच संधी मिळालेली नाही. ही चित्रपटसृष्टी अत्यंत वेगळी आहे. आपल्याला चांगले प्रोजेक्ट्स मिळत नसल्याचे अनेक लोक म्हणत असतात. परंतु मला तर नकार देण्यासाठी देखील कुठलाच प्रोजेक्ट मिळालेला नाही असे अंकिता म्हणाली.
‘पवित्र रिश्ता’ या सीरियलद्वारे अंकिताला देशभरात प्रसिद्धी मिळाली होती. दिवंगत अभिनेता सुशांत सिंहसोबत तिच्या जोडीला मोठी पसंती मिळाली होती. सीरियलदरम्यानच दोघेही रिलेशनशिपमध्ये होते. परंतु काही वर्षापर्यंत परस्परांना डेट केल्यावर दोघांनी बेकअप केले होते. अंकिताने 2021 मध्ये उद्योजक विक्की जैनसोबत विवाह केला आहे.