Tarun Bharat

मला गृहमंत्रीपद हवं होतं; पण वरिष्ठांनी ते दिलं नाही

पुणे / प्रतिनिधी :

आघाडी सरकारमध्ये आपल्याला गृहखाते हवे होते, पण वरिष्ठांनी ते दिले नाही, अशी मनातली खदखद विरोधीपक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी शुक्रवारी बोलून दाखविली.

अजित पवार सध्या पुणे जिह्यातील विविध मतदारसंघांचा दौरा करत आहेत. आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन सुरू केले आहे. अजित पवार म्हणाले, पाच वर्षापूर्वी मला उपमुख्यमंत्री केले तेव्हा मी वरिष्ठांना म्हटले होते की माझ्याकडे गृहखाते द्या. पण ते मिळाले नाही, पहिल्यांदा अनिल देशमुखांना हे खाते मिळाले. त्यांच्याकडून हे गृहखाते गेल्यावर म्हटले होते की आता तरी द्या. त्यानंतर ते खाते दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे गेले. वरिष्ठांनी निर्णय घेतल्यानंतर बोलता येत नाही.

अधिक वाचा : खानदेशातील लोकप्रिय डान्सर जोडप्याला पुणे पोलिसांनी केली अटक

वरिष्ठांना वाटले की, याच्याकडे गृहखाते दिले तर आपलं कोण ऐकणार? हे खर आहे की माझ्याकडे गृहखाते दिले तर मला जे योग्य वाटते तेच करणार. सगळय़ाचा समान न्याय देतो, राष्ट्रवादीचा जर कोणी चुकला, आणि मला कोणी सांगितले की दादा याला पोटात घ्या. पण मी कुणालाही पोटात घेत नाही. सगळय़ांना नियम सारखेच. आपल्या कार्यकर्त्यावर अन्याय झाला तर त्याच्यासाठी जीवाचे रान करेल, पण चुकला तर, त्यांच्यावर पांघरुण घालणार नाही, असेही पवार यांनी स्पष्ट केले.

Related Stories

नाशिक पोलीस प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थींना सुट्टी द्यावी : आ. गोपीचंद पडळकर

Archana Banage

‘ग्रेड सेपरेटर’ चे काम 15 ऑगस्ट पूर्वी पूर्ण होणार – पालकमंत्री

Archana Banage

शाहू विचार जागर यात्रा बहुजनांसाठी दिशादर्शक : श्रीमंत शाहू छत्रपती

Abhijeet Khandekar

उद्यापासून 15 मार्गांवर रेल्वे धावणार

Archana Banage

सख्ख्या बहिणीला आस्मान दाखवत धनश्री फंड ठरली मंगळवेढा महिला केसरी

Patil_p

नागठाण्यात एटीएम मशीन जिलेटीनने फोडले

Patil_p